Advertisement

Crime | खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून भरदिवसा दरोडा, धायरीतील सराफ दुकान लुटले; पोलिसांचा तपास सुरू…

खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून भरदुपारी २५ ते ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी धायरी भागात घडली.

पुणे : खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून भरदुपारी २५ ते ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी धायरी भागात घडली. धायरीतील रायकर मळा येथील काळुबाई चौकातील श्री ज्वेलर्स या सराफा दुकानावर दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी हा दरोडा पडला. यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुकान लुटले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरीतील रायकर मळा येथील श्री ज्वेलर्सचे मालक विष्णु सखाराम दहिवाल व त्यांचा एक कामगार दुपारी दुकानात होते. त्यावेळी एक जण दुकानात आला. त्याने सोन्याची चैन दाखविण्यास सांगितले. विष्णु दहिवाल  यांनी त्याला सोन्याची चैन दाखविली. त्याचवेळी आणखी दोघे जण दुकानात शिरले. तिघांनी मिळून दहिवाल यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यानंतर  त्यांना धमकावून शिवीगाळ केली. चोरट्यांनी दुकानातील २५ ते ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने गोळा केले. दुकानाचे मालक दहिवाल यांनी चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांनी त्यांना हाताने तसेच पिस्टलच्या बॅटनने मारहाण केली. चोरी करून चोरटे दुचाकीवरुन पळून गेले. मात्र  पळून जाताना चोरट्यांच्या हातातील नकली पिस्तूल तुटून दुकानात पडले. घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विष्णु दहिवाल यांनी पोलिसांना चोरट्यांचे वर्णन दिले. त्यांच्याकडील पिस्तूल हे नकली असल्याचे आढळून आले.

दरम्यान, हा दरोड्याचा प्रकार घडला वीज पुरवठा खंडीत झाला होता. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहरात नाकेबंदी करुन पोलिसांनी परिसरात वाहनांची तपासणी सुरू केली आहे.

गुन्हे शाखा आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. आय कार तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद केले जाईल असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; मुख्यंत्र्यांना लिहिणार पत्र अन्...

Next Post

Aditya Thackeray : ...मग गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात, आदित्य ठाकरे यांचा शिंदेंना टोला