संग्रहित छायाचित्र
पुणे: कोरेगाव पार्क भागातील एका तांत्रिक शाळेतील शिक्षकेचा शाळा प्रशासकाकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२३ ते २०२४ या दरम्यान घडला.
या प्रकरणी वडगावशेरीतील ५२ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रशांत पुष्टी (वय ५२) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागातील एका तांत्रिक शाळेत फिर्यादी महिला १२ वर्षांपासून कार्यरत आहे. या शिक्षेकाला शाळा प्रशासनानाकडून २०२३ पासून आजपर्यंत त्रास दिला जात होता. शाळा प्रशासक आरोप पुष्टी यांनी या शिक्षकेवर लैंगिग दृष्ट्या आत्याचार केल्याचा आरोप आहे. याबाबत शिक्षकेने आरोपीची तक्रार शाळेच्या मुख्यध्यापकांकडे तक्रार दिली होती. परंतु त्यानंतर बघू, बोलू कारवाई करु असे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपीकडून सातत्याने शिक्षकेला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास दिला जात होता. शाळेतील अंतर्गत वाद सुरुच होता. याच शिक्षकेने एका विद्यार्थ्याला हात उगारल्याचा प्रकार घडला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांना येत शिक्षकेला जाब विचारला होता. शिक्षकेने त्याबाबत माफी मागितल्याने हा वाद संपला होता. परंतु आरोपीने हा वाद उकरुन शिक्षकेविरुध्द शाळा प्रशासनाकडे तक्रार सांगितले होते. शिवतारा पर्यटन स्थळाकडे जाताना शिक्षकेवर शेरेबाजी करण्यात आली होती.
आरोपीकडून शिक्षकेवर अश्लिल शेरेबाजी सुरु होती. तसेच शिक्षेकेला मिठी मारून लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. या बाबत कोणाला सांगितल्यास शाळेच्या नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली. शेरेबाजी करुन स्त्री मनास लज्जा निर्णाण होईल अशी कृत्य केले. शाळा प्रशासनाकडून शिक्षकेला त्रास दिला जात आहे. तसेच आरोपी शाळा प्रशासक याला पाठिंशी घातले जात आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क भागातील एका तांत्रिक शाळेतील शिक्षकेवर शेरेबाजी केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. शिक्षकेने याप्रकरणी विशाखा कमिटीकडे तक्रार दिली होती. कमिटीने सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही. आरोपी हा मेडिकलचे कारणदेत सुट्टीवर असल्याची माहिती समजते. शाळेत जावून माहिती घेतली जाणार आहे. हा प्रकार २०२३ ते २०२४ या काळात सुरु होता.
- वर्षा अॅन्थोनी, सहायक पोलीस फौजदार.