Crime News: पेरणे येथील गावठी दारू हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

पुणे: पेरणेगाव ते कोळपे वस्ती रोडवर असणाऱ्या गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट ६ ने केलेल्या या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 1 Oct 2024
  • 08:07 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

Crime News: पेरणे येथील गावठी दारू हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

पुणे: पेरणेगाव ते कोळपे वस्ती रोडवर असणाऱ्या गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट ६ ने केलेल्या या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरला युनिट ६ चे पोलीस अधिकारी व अंमलदार  युनिटच्या हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त  घालत होते. यावेळी  ऋषीकेश ताकवणे  यांना माहिती मिळाली की पेरणेगाव ते कोळपे वस्ती रोड येथे एक महिला भट्टी लावून दारू तयार करीत आहे. याबद्दल खात्रीशीर माहिती घेऊन पोलिसांच्या टीमने अचानक या ठिकाणी छापा घातला. यावेळी एक महिला तिच्या घराच्या मागे भट्टी लावून दारू काढत असताना सापडली. घटनास्थळावरून या महिलेच्या ताब्यातून ७० लीटर  गावठी हातभट्टीची तयार दारू आणि पाच हजार लीटर दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन असा एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना कारवाईत मिळून आला. या महिलेला ताब्यात घेऊन तिला पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. 

ही कामगिरी  अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक  यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (युनिट ६) सुदर्शन गायकवाड, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest