चेन स्नॅचींगच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जेरबंद
पुणे: चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज येथील जैन मंदिराजवळून १८ जानेवारी रोजी अटक केली.
घडले असे, १२ ऑक्टोबर २०२३ रोजी फिर्यादी महिला आणि सह फिर्यादी महिला कात्रज तळ्यावरुन पायी वरखेडनगरकडे जात होत्या. त्यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्याने महिला आणि सह फिर्यादी महिलेच्या गळ्यातील चेन जोरदार हिसका मारून चोरी केली होती. यामध्ये एकूण तीन आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सागर संदीप शर्मा उर्फ भोवते, वय २०, रा. लेक टाउन, पुणे, त्याचा साथीदार अमोल रवींद्र आडम, वय २४, रा. शंकरनगर, कात्रज, आणि प्रथमेश उर्फ पिल्या प्रकाश ठुमके, रा. घोटी इगतपुरी, नाशिक यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
यातील आरोपी सागर संदीप शर्मा उर्फ भोवते यास पोलिसांनी १९/१०/२०२३ ला अटक करून त्याच्याकडून २ सोन्याच्या चेन्स जप्त केल्या होत्या. यातील आरोपी साथीदार अमोल रवींद्र आडम हा तेव्हापासून फरार होता. ठाणे अंमलदार अभिजीत जाधव आणि विक्रम सावंत यांना आरोपी कात्रज येथील जैन मंदिराजवळ असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर त्यांनी अमोल रवींद्र आडम तेथे जाऊन अटक केले.
सदरची कामगिरी भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा.पो.निरी. अमोल रसाळ, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, राहुल तांबे, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.