Molestation : कमांड हॉस्पिटलच्या डॉक्टरचा रस्त्यात अडवीत विनयभंग

कमांड हॉस्पिटलच्या (Command Hospital) मेडिकल ऑफिसरला अडवून त्यांच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग करण्यात आला. तसेच, त्यांचा फोन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस (Wanwadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Molestation

कमांड हॉस्पिटलच्या डॉक्टरचा रस्त्यात अडवीत विनयभंग

पुणे : कमांड हॉस्पिटलच्या (Command Hospital) मेडिकल ऑफिसरला अडवून त्यांच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग करण्यात आला. तसेच, त्यांचा फोन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस (Wanwadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना कमांड हॉस्पिटल जवळच्या रस्त्यावर घडली. ही महिला कमांड हॉस्पिटलमध्ये काम संपवून घरी चालत जात होती. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकी वरून दोन आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांची झटापट करीत त्यांना अश्लील स्पर्श केले. ही महिला मदतीसाठी जोरजोरात ओरडत असताना त्यांचा मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest