संग्रहित छायाचित्र
पुणे : इट क्लब नावाच्या कंपनीच्या मॅनेजर आणि (Pune News) डिलिव्हरी बॉयमध्ये (Delivery boy) झालेली भांडणे मिटवीत असताना २३ वर्षीय कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर येथील दीनदयाळ हॉस्पिटलच्या ( Deendayal Hospital) बिल्डिंग मधील इट क्लब (Eat Club) कंपनीच्या शाखेच्या बाहेर काढली.
गोपाळ कुमार, कुलदीप मौर्य अशी गुन्हा दाखल (Pune Crime News) झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजय भगवान शिंदे (रा. पिंपरी चिंचवड, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. गोपाळकुमार हा इट क्लब कंपनीचा मॅनेजर आहे. तर, कुलदीप हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.
कामावरून त्यांच्यामध्ये वाद झालेला होता. त्याचे पर्यावासन भांडणात झाले. त्यावेळी शिंदे यांनी ही भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत स्टीलच्या पाईपने डोक्यात जबरी मारहाण करून गंभीर जखमी केले.