Pune : मारहाण करीत लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

तरुणाला मारहाण करीत त्याच्याकडील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आली ही घटना वडगाव पुलाजवळील स्प्रिंगफिल्ड सोसायटीमध्ये घडली.

Pune : मारहाण करीत लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

मारहाण करीत लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

पुणे : तरुणाला मारहाण करीत त्याच्याकडील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आली ही घटना वडगाव पुलाजवळील स्प्रिंगफिल्ड सोसायटीमध्ये घडली.

याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidhyapith Police) विशाल कांबळे (Vishal Kambale) (वय २४, रा. साईबाबा मंदिर, वेताळ नगर रोड) याला अटक केली आहे. याप्रकरणी उमेश बाळासाहेब सोनवणे (वय ३३, रा. अरीहंत रेसिडेन्सी, सिंहगड कॅम्पस, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे हे मोटरसायकल वरून वडगाव पुलाखालून जात होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्याला लिफ्ट दिली असता आरोपीने त्यांना 'मी आत्ताच एकाला मारून आलो आहे. मला पैसे दे... नाहीतर मी तुला पण मारेल' अशी धमकी दिली.

जबरदस्तीने त्यांच्याकडून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनवणे हे मदतीसाठी स्प्रिंगफिल्ड सोसायटीच्या मेन गेटमधून आत धावले. त्यावेळी आरोपीने त्याच्या हातात लाकडी फळी घेतली. त्यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशामधून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आजूबाजूचे लोक सोनवणे यांच्या मदतीला धावले असता आरोपी याने त्यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest