श्वानासाठी खाद्य देण्याच्या बहाण्याने बलात्काराचा प्रयत्न
पुणे : पाळलेल्या श्वानांना खाण्यासाठी रेशनचे तांदूळ देण्याच्या बहाण्याने एका ४५ वर्षीय महिलेला विश्रांतवाडी येथील गोडाऊनमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोविंद सिंग रंधवा (Gobind Singh Randhawa) (वय ६०, रा. संगमवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला खडकी येथे राहण्यास आहे. पीडित महिला आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने या महिलेला त्यांच्या पाळीव श्वानांना रेशनचे तांदूळ देतो असे सांगितले. हे तांदूळ घेण्यासाठी त्यांना मोटरसायकलवर बसवून विश्रांतवाडी येथील भारत नगर मधील पोरवाल रोडवर असलेल्या एका गोडाऊनमध्ये नेले.
या महिलेचे लक्ष नसताना त्याने गोडाऊनची कडी आतून बंद करून घेतली. या महिलेकडे बघून 'मला सेक्स ची इच्छा होत आहे. तुला बघून माझ्या लैंगिक भावना उत्तेजित झाल्या आहेत' असे म्हणत तिचा विनयभंग केला. त्यानंतर स्वतःचे कपडे काढून नग्न अवस्थेत तिच्यासमोर उभे राहून बलात्काराचा प्रयत्न केल्य