रुग्णवाहिका चालकावर गोळीबार; परवानाधारक पिस्तुलाचा दुरुपयोग

वाघोली येथे एका व्यक्तीने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडून, रुग्णवाहिका चालकाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १३) घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 14 Dec 2024
  • 07:08 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वाघोली पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

वाघोली येथे एका व्यक्तीने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडून, रुग्णवाहिका चालकाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १३) घडला.

हा प्रकार केसनंद येथील आर्यन बिअर बारमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपींनी परिसरात दहशत पसरवून रुग्णवाहिकेची तोडफोड केली. गोळीबार करणारा बाकोरी येथील रहिवासी विशाल कोलते आणि केसनंद येथील रहिवासी संदीप हरगुडे आणि अमोल हरगुडे यांच्यावर वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुधाकर कानडे (३५, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

कानडे लोणी काळभोर येथील जागृती पुनर्वसन केंद्रासाठी रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतात. आरोपी संदीप हरगुडे याच्या पत्नीने पुनर्वसनासाठी संदीपचा अर्ज सादर केला होता. त्यानुसार, केंद्राने रुग्णवाहिका पाठवली होती. रुग्णवाहिका चालक सुधाकर कानडे यांच्या फिर्यादीनुसार, केंद्राचे कर्मचारी संदीपला घेऊन जाण्यासाठी त्याच्याशी चर्चा करत होते. त्याचवेळी विशाल कोलते तिथे आला. संदीपने रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना विरोध केला. विशालने आरडाओरडा करीत त्याला पुनर्वसन केंद्रात जाऊ देणार नाही,अशी भूमिका घेतली. यानंतर विशालने आपली रिव्हॉल्व्हर काढून दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

गोळीबारानंतर, विशाल, संदीप आणि अमोल यांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करून गाडी फोडली. या हल्ल्यात गाडीच्या पुढील काचा आणि साईड काचा तुटल्या. यावेळी विशालने परिसरात पिस्तुल नाचवीत आरडाओरडा करीत दहशत पसरवली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि दुकानमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हे शाखेचे उपआयुक्त निखिल पिंगळे, वाघोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडित रेजीतवाड आणि उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी यांनी घटनास्थळी भेट दिली.

“आरोपींनी रुग्णवाहिका चालकावर दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने कोणतीही जखम झाली नाही. आरोपींनी घटनास्थळी रुग्णवाहिकेची तोडफोड केली. आम्ही विशाल कोलटे आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान आणि आर्म्स अ‍ॅक्टच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. विशालच्या घराची झडती घेतली असता १६ काडतुसे आणि रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी वापरलेल्या दोन गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे,” असे निरीक्षक रेजितवाड यांनी सांगितल

Share this story

Latest