संग्रहित छायाचित्र
वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ५ कडून जेरबंद करण्यात आले. अक्षय संतोष राख (वय १९, रा. काळेपडळ, हडपसर) असे संबंधित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरला गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिटच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांनी वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अक्षय राख याला पकडले. त्याला पूढील कार्यवाहीसाठी वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, गुन्हे शाखा, युनिट ५ व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.