Crime News : कमरेला देशी पिस्तूल लावून फिरणारा जेरबंद, गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त; स्वारगेट पोलिसांची कारवाई

देशी पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्या सराईत गुंडाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 17 Apr 2025
  • 08:10 am
pune mirror, crime news, marathi news, pune news, pune police

देशी पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्या सराईत गुंडाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. भक्तीसिंग दिपकसिंग दुधानी  असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. याआधी त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (१४ एप्रिल)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी स्वारगेट पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक गुलटेकडी येथील डायसप्लॉट चौकात बंदोबस्ताला होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांना डायसप्लॉट परिसरात सराईत गुन्हेगार भक्तीसिंग दिपकसिंग दुधानी  हा कमेरला पिस्तूल लावून फिरत असल्याचे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांनी त्यांना पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. 

पोलीस अंमलदार शेख आणि पवार हे संबंधित ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना दुधानी त्यांना तिथे असल्याचे आढळले. पोलीस त्याच्याकडे जाऊ लागताच दुधानी तिथून पळून जाऊ लागला. तो एका गल्लीमध्ये घुसला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल असल्याचे आढळले. त्यानंतर त्याच्या पँटच्या उजव्या खिशात पोलिसांना दोन जिवंत काडतुसे  आढळली. पोलिसांनी त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त केला. 

दरम्यान, दुधानीविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह-आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रविण कुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, हवालदार  मोराळे, शिंदे, अंमलदार पवार, खेंदाड, शेख, चव्हाण, दुधे, घुले, टोणपे यांनी ही कारवाई केली.

Share this story

Latest