उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील पेठ ता.हवेली जि. पुणे येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय महिलेला तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी दोघांविरोधात उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन या प्रकरणी पेठ गावचा माजी सरपंच सुरज भालचंद्र चौधरी आणि त्याचा सावकार मित्र राजेश लक्ष्मण चौधरी या दोघांना अटक केली आहे. सदर प्रकरणात पीडित महिलेने उरुळी कांचन पोलिसात तक्रार दिली आहे. हे दोघे पतीचे मित्र असल्याचे समोर येत आहे.माजी सरपंच सुरज चौधरी हा शिरुर हवेलीचे आमदार कटकेंचा पूर्व हवेलीतील क्रियाशील सक्रिय कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश लक्ष्मण चौधरी याने २० फेब्रुवारी २०२३ रोजी पीडित महिला एका दुकानात साडी खरेदी करत असताना त्याचे फोन वरून पीडित महिलेला फोन करून सांगितले की तू साडी घे मी ऑनलाईन पैसे पाठवतो.परंतु पिडीतीने पैसे घेण्यास नकार दिला.तेव्हा राजेश याने पीडितेला दुकानाच्या बाहेर बोलावून सांगितले की, तुझ्या घरी तुझे कपडे बदलतानाचे अर्ध नग्न फोटो माझ्याकडे आहेत. तू जर माझ्याकडून पैसे घेतले नाहीत तर मी ते फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली व ५००० रुपये ऑनलाइन पद्धतीने पीडितेला पाठवले.
त्यानंतर २०२३ या वर्षात राजेश याने पीडित महिला रस्त्याने जात असताना चार चाकी मधून येऊन तू मला भेट, माझ्याशी संबंध ठेव अन्यथा मी तुझे फोटो व्हायरल करील अशी धमकी दिल्याने, इच्छा नसताना त्याच्याबरोबर गाडीत बसावे लागले. त्याने गाडी लोणी काळभोर येथील एका लॉज वर नेऊन तेथे बलात्कार केला.नंतर पाच ते सहा लाख रुपये त्याने ऑनलाइन पैसे माझ्या खात्यावर टाकले. त्यानंतर मी त्याला फोटो डिलीट करण्यास सांगितले असता तो म्हणाला की माझे पैसे मला परत द्या. म्हणून पीडितेने दागिने मोडून ८ लाख रुपये रोख रक्कम राजेशला परत दिले. त्यानंतर त्यांनी अजून पैशाची मागणी केली म्हणून पीडितीने तिच्या आईच्या कॅनरा बँकेच्या खात्याचा ४ लाख ९५००० हजार रुपयांचा धनादेश दिला. राजेशने तो धनादेश वटवून पैसे काढून घेतले. एवढे पैसे दिल्यानंतर मी त्यास फोटो डिलीट करण्याची विनंती केली असता त्याने माझ्याशी संबंध ठेव अन्यथा तुला व तुझ्या मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली.
याच गोष्टीचा गैरफायदा घेत पेठ गावचा माजी सरपंच सुरज भालचंद्र चौधरी याने पीडितेला २७ एप्रिल २०२५ रोजी फोन करून महत्त्वाचे बोलायचे आहे म्हणून लोणीकंद या ठिकाणी बोलावून घेतले व राजेश कडील अश्लील फोटो दाखवतो म्हणून पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर एका हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला.
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून वारंवार लोणी काळभोर, भांडगाव, लोणीकंद या ठिकाणाच्या लॉज वर नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेने आत्तापर्यंत १२,५०,००० रुपये रोख व धनादेश स्वरूपात परत दिले आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण तपास उरुळी कांचन सहाय्यक पोलीसय निरीक्षक मीरा म्हटले करीत आहेत.