File Photo
बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या आरोपींकडे सखोल चौकशी केल्यावर आणखी ७ जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती), जय उर्फ जयेश अशोक मोरे (रा. तांदूळवाडी, बारामती) या चार आरोपींना सुरुवातीलाच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ओंकार भारती, ओम कांबळे, आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे आणि श्रेणिक भंडारी या सातजणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील नववीत शिक्षण घेणार्या दोन अल्पवयीन मुली घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या दोघी हडपसर या ठिकाणी आल्यावर, आरोपी ज्ञानेश्वर आटोळे यांच्याशी पीडित मुलींनी संपर्क साधला. त्यानंतर आरोपी आटोळे याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना सांगितले की, रूमवर दोन मुली आल्या आहेत. त्यानंतर त्याचे तीन मित्र रूमवर आले. त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना दारू पाजून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
आमच्याकडे आरोपींबाबत तक्रार येताच ज्ञानेश्वर भारत आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे, यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे आणि जय उर्फ जयेश अशोक मोरे या चौघांना अटक करण्यात आली. या चारही आरोपींकडे अधिक चौकशी केल्यावर आणखी सातजणांनी त्या दोन मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानुसार ओंकार भारती, ओम कांबळे,आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे आणि श्रेणिक भंडारी या सातजणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सागितले.
तक्रार पेटीमुळे वाचा
बारामतीतील दोन मुलींना पुण्यात बोलावून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ माजली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली होती. पीडित मुलगी एका शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी या मुलीच्या नात्यातील आहे.
या प्रकाराची माहिती वडिलांना दिल्यास ते चिडतील, वाद होतील या शक्यतेने मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती. अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. मुलीने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती अर्जात लिहिली होती.
मुलीने ही माहिती तक्रार पेटीत टाकली. शालेय प्रशासनाने तिचा अर्ज पाहिला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीच्या नात्यातील २१ वर्षीय तरुणाला अटक केल्यानंतर चौकशीची सूत्रे फिरली. त्याच्याविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. त्यानंतरच्या चौकशीत बाकीच्या आरोपींची नावे प्रकाशात आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.