नियमनाऐवजी वसुली करणारा कर्मचारी निलंबित

वाहतूक नियमनाऐवजी वाहनचालकांना अडवून त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या फरासखाना वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले.

नियमनाऐवजी वसुली करणारा कर्मचारी निलंबित

नियमनाऐवजी वसुली करणारा कर्मचारी निलंबित

हुतात्मा चौकात कारवाईदरम्यान लपवली नेमप्लेट

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

वाहतूक नियमनाऐवजी वाहनचालकांना अडवून त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या फरासखाना वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले.

पोलीस नाईक अनिल कल्लाप्पा जामगे असे निलंबित केलेल्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याचे नाव आहे. जामगे हे फरासखाना वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. ११ मार्च रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जामगे शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा चौकात (बुधवार चौक) वाहतूक नियमन करत होते. सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीस्वार बुधवार चौकातील सिग्नलवर थांबला होता.

दुचाकीच्या वाहन क्रमांकाच्या पाटीवरील क्रमांक अन्य शहरातील होता. बुधवार चौकात नियमन करणारे जामगे यांनी दुचाकीस्वाराला  अडवले आणि त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली. दुचाकीस्वाराकडे परवाना नसल्याचे समजल्यानंतर जामगे यांनी त्याला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितला. दुचाकी वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे चौकशीत समजले. तेव्हा जामगे यांनी दुचाकीस्वाराला दहा हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. तक्रारदाराकडे डेबिट कार्ड नव्हते. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने दंड जमा करता येणे शक्य नव्हते. त्यानंतर तक्रारदार दुचाकीस्वाराची दुचाकी जामगे यांनी वाहतूक विभागात आणली. जामगे यांनी गणवेशावरील नावाची पट्टी (नेमप्लेट) पाडून ओळख लपविली.

दुचाकीस्वाराने याबाबत वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी बाॅडी कॅमेऱ्याचा वापर करावा, असे आदेश पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिला आहे. मात्र, जामगे यांनी कारवाई करताना बाॅडी कॅमेऱ्याचा वापर केला नाही. वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष केले. जामगे यांचे वर्तन बेजबाबदार असल्याचे चौकशीत उघड झाल्याने पोलीस उपायुक्त मगर यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story