इमारतीचे बांधकाम सुरू असताना खड्डयात पडला कामगार
पुणे - इमारतीचे बांधकाम सुरू असताना एक कामगार उंचावरुन खड्डयात पडलेल्या कामगाराला अग्निशमन दलाच्या जवानांना वाचविण्यात यश आहे आहे. खिल्लारे रस्ता, शारदा सेंटर जवळ, एरंडवणा येथे आज (दि.5) दुपारी ०३•२५ वाजता ही घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनूसार, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोच पोहचले तेव्हा त्यांनी पाहिले की, हा कामगार सुमारे वीस ते पंचवीस फुट उंचीवरुन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी एका खड्डयात पडल्यामुळे त्याच्या शरीरात लोखंडी सळई आरपार गेली होती. दलाच्या जवानांनी थोडाही विलंब न करता शिडी व हायड्रोलिक किटचा वापर करीत त्याच्याशी संवाद साधून धीर देत सळई कापली. तसेच त्या जखमी कामगारास वर घेतले व प्राथमिक उपचारानंतररुग्णालयात पुढील उपचाराशाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एरंडवणे अग्निशमन दलाच्या जवानांनी फक्त पंधरा मिनिटात कार्यवाही पुर्ण केली.
ही कामगिरी वाहनचालक सचिन क्षीरसागर, तांडेल अनंत जाधव व जवान सचिन आयवळे, सागर मुंढे, राहुल वाघमोडे, आशुतोष पिंगळे, निलेश पाटील, कमलेश माने, सुमित कांबळे यांनी केली.