पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडुन (पीएमपी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे आणि पी.एम.आर.डी.ए. हद्दीत बससेवा पुरविली जाते. दैनंदिन संचलनात असलेल्या बसेसमध्ये पीएमपीच्या स्वमालकीच्या व खाजगी बस पुरवठादारांच्या बसेसचा समावेश आहे. या बस चालक आणि वाहकांकडून वाहतुकीचे नियम पाळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता दंडात्मक कारवाईसह निलंबनाची कारवाईचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिल्या आहे.
पीएमपीच्या स्वमालकीच्या व खाजगी बस पुरवठादारांच्या बसेसवरील चालक-वाहक सेवक हे वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रवाशी नागरिक, सजग नागरिक मंच, पीएमपीएमएल प्रवाशी मंच तसेच सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्याकडुन तक्रारी व सुचना प्राप्त होत असतात. या तक्रारी व सूचनांमध्ये प्रामुख्याने बस चालविताना मोबाईलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे आदी तक्रारींचा समावेश आहे.
पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाकडील व खाजगी बस पुरवठादारांकडील चालक-वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण होणाच्या द्दष्टीने पीएमपी प्रशासनाने परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास चालक-वाहक सेवकांवर २००० रूपये
इतकी दंडात्कम कारवाई अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
असे नमूद करण्यात आले आहे.
या परिपत्रकात दिलेल्या सूचना ..
१. बस चालविताना चालकाने मोबाईलवर बोलू नये.
२. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून बस चालविणे.
३. चालक-वाहक सेवकाने कोणत्याही प्रकारचे धुम्रपान करू नये.
४. प्रवाशांना चढ-उतार करणे सुलभ होईल अशा रीतीने बस बसथांब्यालगत उभी करणे.
५. लेनच्या शिस्तीचे पालन करणे.
६. भरधाव वेगाने बस चालवू नये.