पुण्यात व्हॉल्वो बसला भरदुपारी भीषण आग; प्रवाशांनी घेतल्या उड्या VIDEO

पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भीषण आग लागल्याची घटना

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Thu, 17 Apr 2025
  • 01:38 pm

पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खेड शिवापूरजवळ अचानक बसला आग लागली, या भीषण आगीत बस जळून खाक झाली. या घटनेचे फोटो व्हिडीओ समोर आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, या बसमधून 20 ते 25 प्रवाशी प्रवास करत होते, आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या. या दुर्घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. मात्र, बसला आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलं नाही.

आगीच्या घटनेसंदर्भात अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे. मात्र, आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन गाडी येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाची गाडी आणि ॲम्बुलन्स थोड्या उशिराने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)

 

Share this story

Latest