Pune | प्रजासत्ताक दिनी ‘घर घर संविधान’ उपक्रमाअतंर्गत होणार संविधानाचा जागर....

‘घर घर संविधान’उपक्रमांतर्गत विविध शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, व्याख्यान, दौंड, रॅली व संविधान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 23 Jan 2025
  • 01:01 pm
Department of Social Justice,

संग्रहित छायाचित्र....

पुणे : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘घर घर संविधान’ हा उपक्रम सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राज्यभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनी संविधानाचा जागर होणार आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२५ रोजी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व पालकमंत्री यांच्या हस्ते संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सर्व आस्थापनांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्ये विद्यार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित, स्वयं अर्थसहाय्य, आश्रम शाळा तसेच ग्रामीण व नागरी स्वराज संस्था महाराष्ट्र विधान परिषद विधानसभा अशा सर्व ठिकाणी ‘घर घर संविधान’ हा उपक्रम २६ नोव्हेंबर २०२४ पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, व्याख्यान, दौंड, रॅली व संविधान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे, असेही सहायक आयुक्त लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Share this story

Latest