तीन महिन्यांत पुणे मेट्रो प्रवाशांची संख्या ४६ टक्क्यांनी वाढली
पुणे मेट्रो टप्पा – २ मध्ये बालाजीनगर, बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानके; राज्य शासनाची अतिरिक्त खर्चास मान्यता
काही लोकांच्या पोटात दुखतय… GR वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जरांगेंचे सडेतोड उत्तर
Advertisement

पुणे मेट्रो टप्पा – २ मध्ये बालाजीनगर, बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानके; राज्य शासनाची अतिरिक्त खर्चास मान्यता

pune metro august 15 peak hour service six minute frequency during rush hour

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर व बिबेवाडी येथे ही दोन मेट्रो स्थानके उभारली जाणार असून त्यासाठी येणाऱ्या ६८३.११ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार असून वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेचा २२७.४२ कोटी रुपये, ‘ईआयबी’चे द्वीपक्षीय कर्ज ३४१.१३ कोटी रुपये, तर राज्य करांसाठी राज्य शासनाचे दुय्यम कर्ज ४५.७५ कोटी रुपये व व्याज रक्कमा राज्य शासनाचे अतिरिक्त बिनव्याजी दुय्यम कर्ज ६८.८१ कोटी रुपये अशा मिळून एकूण ६८३.११ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुणे मेट्रो टप्पा-२ चा विस्तार अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.

आज (03 सप्टेंबर)च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय पुढील प्रमाणे-

सामाजिक न्याय विभाग

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ
लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार.

ऊर्जा विभाग

महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित.

कामगार विभाग

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा.

कामगार विभाग

कारखाने अधिनियम, १९४८ मध्ये सुधारणा.

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार

नगर विकास विभाग

मुंबईतील आणिक डेपो- वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका- ११ प्रकल्पास मान्यता. २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद

नगर विकास विभाग

ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – २, मार्गिका – ४ तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. २) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसहाय्यित कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास, प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास मान्यता.

नगर विकास विभाग

पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.

नगर विकास विभाग

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ व ३अ प्रकल्पातील लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांच्या खरेदीसाठी कर्जास मान्यता
बाह्य सहाय्यित कर्ज घेण्याऐवजी पूर्णतः रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास, तसेच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने ५०% आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

नगर विकास विभाग

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प या प्रकल्पातील राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागास मान्यता

नगर विकास विभाग

पुणे ते लोणावळा लोकल (उपनगरीय रेल्वे) च्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद करणार. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर आर्थिक भार उचलणार

नगर विकास विभाग

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग
हा प्रकल्प सिडको महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी-भागीदारी अंतर्गत तत्त्वावर राबविण्यात येणार

नगर विकास विभाग

“नविन नागपूर” अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणार
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोधणी (रिठी) व मौजा लाडगांव (रिठी), तालुका हिंगणा जि. नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र ६९२.०६ हे. आर. जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ “नविन नागपूर” अंतर्गत विकसीत करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास तत्वत मान्यता.

नगर विकास विभाग

नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता व त्यालगत चार वाहतूक बेटांची निर्मिती, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता व त्यालगत ४ वाहतूक बेट विकसित करणार.

विधि व न्याय विभाग

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता
प्रकल्पासाठी ३ हजार ७५० कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

तीन महिन्यांत पुणे मेट्रो प्रवाशांची संख्या ४६ टक्क्यांनी वाढली

Next Post

काही लोकांच्या पोटात दुखतय… GR वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जरांगेंचे सडेतोड उत्तर