दोन होर्डिंग कोसळले

पुणे महापालिकेने आठवडाभरापूर्वीच मॉन्सूनपूर्व तयारीसाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. मात्र सोमवारी (दि. २०) मुसळधार पावसापूर्वी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धानोरी आधि सणसवाडी परिसरात दोन मोठे होर्डिंग कोसळल्याने प्रशासनाच्या नियमन आणि अंमलबजावणीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

धानोरी आणि सणसवाडी येथील घटना, महापालिका प्रशासनाच्या नियमन आणि अंमलबजावणीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह, मोठी दुर्घटना टळली

पुणे महापालिकेने आठवडाभरापूर्वीच मॉन्सूनपूर्व तयारीसाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. मात्र सोमवारी (दि. २०) मुसळधार पावसापूर्वी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धानोरी आधि सणसवाडी परिसरात दोन मोठे होर्डिंग कोसळल्याने प्रशासनाच्या नियमन आणि अंमलबजावणीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

धानोरी-पोरवळ रोडवरील एक भला मोठा  जाहिरातफलक अचानक कोसळला. तेथून काही वेळेआधीच पादचारी आणि वाहनांची वर्दळ सुरू होती. धानोरीतील दुर्घटनेनंतर संध्याकाळी एक मोठे होर्डिंग अहिल्यानगर रोड (सणसवाडी) परिसरात कोसळले. या घटनेत ७-८ दुचाकींचे नुकसान झाले. दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेनंतर स्थानिकांकडून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे व्यक्ती नसल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी दत्ता सातव यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरू झाले, पण रहिवाशांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, १३ मे रोजी पुणे महापालिकेच्या लाईसन्स आणि स्काय सायनेज विभागाकडून जाहिरात संघटनांबरोबर एक बैठक घेतली होती. यामध्ये होर्डिंगच्या संरचनात्मक सुरक्षेची प्रमाणपत्रे, खराब फ्लेक्स हटवणे, साइट इन्स्पेक्शन, विमा यांसारख्या तपशीलवार सूचना देण्यात आल्या होत्या.

जर दिलेल्या सूचनांची अंमलबजावणीच केली जात नसेल, तर अशा बैठका घेण्याचा उपयोग काय? थोडीशी वेळ चुकली  असती तर एखाद्याचा जीवही गेला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया वाघोलीतील एका रहिवाशाने दिली.

१३ मे रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत जाहिरातदारांसाठी खालील सूचना दिल्या होत्या... अँटी-रस्ट रंग वापरणे, प्रत्येक होर्डिंगवर आयडी क्रमांक आणि क्यूआर कोड तपासणे, अभियांत्रिकी प्रमाणपत्र अनिवार्य, जुन्या/फाटलेल्या फ्लेक्सची तातडीने विल्हेवाट, पावसाच्या यलो अलर्टपूर्वी छपरांवरील होर्डिंग्स हटवणे, इलेक्ट्रिक होर्डिंगसाठी अर्सिंग व वॉटरप्रूफिंग बंधनकारक, विमा पॉलिसी आणि संबंधित कागदपत्रे पुणे महापालिकेला सादर करणे.

या सूचनांची पूर्णपणे पायमल्ली झाली असून दोन्ही दुर्घटना महापालिकेच्या  निष्काळजीपणाचे उदाहरण ठरत आहेत. प्रशासनाने आता या होर्डिंग्सना परवानग्या होत्या का आणि तपासण्या झाल्या होत्या का याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

आता चौकशीचा खेळ

फक्त आठवडाभरापूर्वी महापालिकेने  सुरक्षा बैठक घेतली होती. प्रशासन आता होर्डिंगच्या परवानग्यांची चौकशी करत आहे. मुंबईत मागील वर्षी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांनी याची गंभीर नोंद घेतली असून, महापालिकेकडून  तात्काळ आणि कठोर अंमलबजावणीची मागणी केली जात आहे.

Share this story

Latest