Accident : पुण्यातील अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल

शहरातील पुणे-बंगळुरू एक्सप्रेस हायवेवरील कणेरीवाडी फाटा येथे थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Sunil Chavan
  • Sun, 27 Apr 2025
  • 08:04 am
pune mirror, crime news, marathi news, pune news, pune police

गाडी चालवताना नेहमी सावध आणि चौकस राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्रत्येक वेळी अपघातासाठी तुमचीच चूक जबाबदार असेल, असं नाही. कधी कधी समोरच्याच्या चुकीमुळेही अपघात होतो. मात्र अशा प्रसंगी, जर तुम्ही सतर्क असाल तर प्रसंगावधान दाखवून संभाव्य नुकसान टाळू शकता.

शहरातील पुणे-बंगळुरू एक्सप्रेस हायवेवरील कणेरीवाडी फाटा येथे थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील असून एक कार रस्ता ओलांडत होती. तेवढ्यात समोरून एक छोटा मालवाहतूक करणारा ट्रक आला. या ट्रकमधून बाहेर आलेल्या लोखंडी रॉड्स थेट कारच्या विंडशील्डवर आदळून आतमध्ये शिरल्या. सळ्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि कारच्या आतील भागापर्यंत घुसल्या.पुण्यातील कार अपघाताचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत होतं. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. 

Share this story

Latest