कोथरुडमध्ये घुमला ‘जय श्रीराम’चा नारा

पुणे : भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरुडमधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी जय श्रीरामच्या जयघोषात रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. या रॅलीत पारंपरिक वेशात महिला सहभागी झाल्या होत्या.

Kothrud,Campaign,BJP, Mahayuti ,candidate, Chandrakant Patil,bike rally, slogan,Jai Shri Ram,Kothrud

नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या

चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद,क्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि स्थापत्य अभियंता संघटनेचा पाठिंबा

पुणे : भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरुडमधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी जय श्रीरामच्या जयघोषात रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. या रॅलीत पारंपरिक वेशात महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी क्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सु. बे. स्थापत्य अभियंता संघटनेने आपला पाठिंबा पाटील यांना जाहीर केला.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसच बाकी आहेत. पाटील यांनी कॉर्नर सभा, सोसायटी मिटिंग, घरोघरी संपर्क यावर भर दिला. विविध संघटनांकडूनही त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या.

तर प्रभागातील मंडळांकडून देखील त्यांचे स्वागत करण्यात आले. एरंडवण्याचे ग्रामदैवत भैरवनाथांचे दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात झाली. या रॉलीत भाजपाचे माजी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, प्रभाग अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, चित्रसेन खिलारे, अमोल डांगे, अनुराधा एडके, गिरीश खत्री, मंदार बलकवडे यांच्यासह भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest