मॉर्निंग वॉक ठरला जीवघेणा

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पती-पत्नीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुर्गेश अंकुश जगताप (३५) या युवकाचा मृत्यू झाला आहे. पाटस -दौंड या रस्त्यावर पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश जगताप व त्यांची पत्नी स्वाती हे दोघे पहाटे दौंड रस्त्यावर पाटसच्या दिशेने मॉर्निंग वॉक करीत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 8 Jun 2023
  • 12:52 am
मॉर्निंग वॉक ठरला जीवघेणा

मॉर्निंग वॉक ठरला जीवघेणा

पाटस -दौंड रस्त्यावर फिरायला गेलेल्या दाम्पत्याला कारची धडक, अपघातात पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज; अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

#दौंड

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पती-पत्नीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुर्गेश अंकुश जगताप (३५) या युवकाचा मृत्यू झाला आहे. पाटस -दौंड या रस्त्यावर पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश जगताप व त्यांची पत्नी स्वाती हे दोघे पहाटे दौंड रस्त्यावर पाटसच्या दिशेने मॉर्निंग वॉक करीत होते. दरम्यान दौंडकडून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने दुर्गेश जगताप यांना जोराची धडक दिली. या अपघातात दुर्गेश हे रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते.

नागरिकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना पाटस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्यांनी यवत येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात जगताप यांच्या पत्नी स्वाती थोडक्यात बचावल्या आहेत. यात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. मयत दुर्गेश यांचा भाऊ योगेश जगताप यांनी यवत पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची  माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सकाळ-संध्याकाळ व्यायाम करायला जाणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे बनले आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. त्यामुळे वाहने अति वेगाने धावत आहेत. व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी वाहनांचा अंदाज घेऊन व्यायाम करणे आवश्यक आहे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest