Pune News : देवदूत… जखमी अवस्थेत पोहोचून डॉक्टरांनी केली फुफ्फुस प्रत्यारोपण

पुण्यातून ‘फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी चेन्नईसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेचाच अपघात झाला. अपघातात डॉक्टर व पथक गंभीर जखमी झाले. मात्र, असलेले डॉक्टरांनी एअर ॲम्बुलन्सने चेन्नईला पोहोचून रुग्णावर फुफ्फुस यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान दिले.

Pune News : देवदूत… जखमी अवस्थेत पोहोचून डॉक्टरांनी केली फुफ्फुस प्रत्यारोपण

देवदूत… जखमी अवस्थेत पोहोचून डॉक्टरांनी केली फुफ्फुस प्रत्यारोपण

येरवडा : पुण्यातून ‘फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी चेन्नईसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेचाच अपघात झाला. अपघातात डॉक्टर व पथक गंभीर जखमी झाले. मात्र,  असलेले डॉक्टरांनी एअर ॲम्बुलन्सने चेन्नईला पोहोचून रुग्णावर फुफ्फुस यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान दिले.

मुंबईतील अपोलो हॉस्पिटलच्या पथकाला पिंपरीतील डी.वाय. पाटील रुग्णालयात आत्महत्या केलेल्या युवकाचे फुफ्फुस चांगल्या स्थितीत असल्याची माहिती मिळाली.चेन्नई येथील चाळीस वर्षाचे रूग्ण फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षेत होते. त्यामुळे अपोलो हॉस्पिटलचे फुफ्फुस प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांचे पथक सोमवारी सायंकाळी डी.वाय. पाटील रुग्णालयातून ‘फुफ्फुस’ घेऊन रुग्णवाहिकेतून लोहगाव विमानतळाकडे निघाले. मात्र, बोपोडी येथे रुग्णवाहिका दुभाजकाला धडकल्यामुळे अपघात झाला. या अपघातात डॉ. संजीव जाधव यांच्यासह पथक गंभीर जखमी झाले.

दरम्यान चेन्नई येथील रुग्णाच्या फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामुळे  विलंब न करता डॉ. जाधव शीतपेटीतील फुफ्फुस घेऊन मोटारीने लोहगाव विमानतळावर पोहचले. तेथे एअर ॲम्बुलन्स तयार होती. त्यामधून ते चेन्नईला पोहचून रुग्णालवर फुफ्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest