पुणे : स्वारगेट-पिंपरी मेट्रो प्रवास आजपासून अवघ्या ३० रुपयांत

स्वारगेटहून पिंपरीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोचा नवा मार्ग आज, रविवारपासून सुरू होत आहे. हा प्रवास अवघ्या ३० रुपयांत करता येणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिका रविवार दुपारी चार वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार आहे.

New Metro route, Swargate, Pimpri, Starting today, Sunday, Fare, 30 rupees, Shivajinagar, Traffic opening, Civic mirror

मेट्रोचा नवा मार्ग आज, रविवारपासून सुरू होत आहे

स्वारगेटहून पिंपरीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोचा नवा मार्ग आज, रविवारपासून सुरू होत आहे. हा प्रवास अवघ्या ३० रुपयांत करता येणार आहे.शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिका रविवार दुपारी चार वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो गर्दीच्या वेळी दर सात मिनिटांनी तर कमी गर्दी वेळी दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.

स्वारगेटपासून मंडई अवघ्या दहा रुपयांत आणि जिल्हा न्यायालयापासून मंडई स्थानकापर्यंतचा प्रवास पंधरा रुपयांत करता येणार आहे. स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मेट्रो सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड, रामवाडी आणि वनाज परिसरातून शहराच्या मध्यवर्ती भागात येणार्‍या प्रवाशांची विनाविलंब वेगवान सोय होणार असल्याने सणासुदीच्या काळात मध्यवर्ती शहरातील खासगी वाहनांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

महामेट्रोच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गिका पूर्णपणे सुरू होत आहेत. या मार्गिकांवरील काही स्टेशनची कामे अद्याप अपूर्ण असली तरी प्रवासी वाहतुकीत कुठलीही अडचण येणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने  स्पष्ट केले आहे.

त्यानुसारच या दोन्ही मार्गिकांवरील काम जसजसे होत गेले तसतशी टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. यातील शेवटच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भुयारी मार्गातील सेवा रविवारी सुरू होत आहे. यामुळे वडगाव शेरी, येरवडा, पिंपरी चिंचवड, खडकी, कोथरूड परिसरातून शिवाजीनगर आणि शहराच्या मध्यवर्ती मंडई आणि स्वारगेट परिसरात येणार्‍या नागरिकांना विनाविलंब सेवा उपलब्ध होणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि पार्किंगसाठी अपुरी जागा असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मध्यवर्ती शहरातून बाहेर पडण्यासाठी एकेरी मार्गावरून धावणारी पीएमपी सेवा असली तरी वाहतूक कोंडीमुळे अवघे चार कि.मी.च्या  प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ जातो. वरील उपनगरातून मंडई आणि स्वारगेट परिसरात येण्यासाठी त्याहून अधिक विलंब होतो. स्वारगेटपर्यंत मेट्रो उपलब्ध झाल्याने नागरिकांना झटपट  प्रवास मिळणार आहे. पुणे मेट्रोचे सर्वाधिक तिकीट दर ३५ रुपये आहे.

 

असे असतील तिकीट दर

  • पीसीएमसी ते स्वारगेट - ३० रुपये
  • वनाज ते स्वारगेट – २५ रुपये
  • रामवाडी ते स्वारगेट – ३५ रुपये

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest