धक्कादायक! ख्रिसमसच्या दिवशी एमपीएससीचा पेपर; विद्यार्थी वर्गातून नाराजीचा सूर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने २५ डिसेंबर रोजी समाज कल्याणचा साहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ व साहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट- अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस सणानिमित्त सार्वजनिक सुटी असतानाही परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने २५ डिसेंबर रोजी समाज कल्याणचा साहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ व साहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट- अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस सणानिमित्त सार्वजनिक सुटी असतानाही परीक्षा घेण्यात येत असल्याने हजारो उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

दोन्ही संवर्गासाठी घेण्यात येणारी ही परीक्षा दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत  मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या केंद्रांवर घेण्यात येणार आहे, तर २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत निवासी वैद्यकीय अधिकारी गट – ब पदासाठी मुंबईत परीक्षा घेण्यात येणार आहे.

त्यामध्ये २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या सुटीच्या दिवशी समाजकल्याण व तत्सम गट-अ संवर्गातील साहाय्यक आयुक्त, साहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट-अ या संवर्गातील पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सणाच्या दिवशीच परीक्षा आल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याच्या संदर्भाने परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. ख्रिसमसच्या  दिवशी परीक्षा घेणे हे  ख्रिश्चन धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांचे उल्लंघन आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयोगाने या प्रकरणात योग्य विचार केला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
- सूरज आढाव, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी

सर्व धर्माचा आदर करणे हे आयोगाचे काम आहे. २५ डिसेंबर रोजी ख्रिचन धर्माचा वर्षातील सर्वात मोठा सण आहे याच दिवशी समाज कल्याणचा पेपर असल्याने या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन यावर तोडगा काढणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story