किरीट सोमय्या
पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या याचिका दाखल करण्यात आहेत. आज (मंगळवार) दुपारी २ वाजता सोमय्या महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाकडे ही याचिका दाखल करणार आहेत. पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी या याचिकेत केली जाणार आहे.
शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर राजू साळूंखे यांना अटक करण्यात आली होती. आता किरीट सोमय्या याचिका दाखल करणार आहेत. कोविड सेंटरमधील रुग्णांचा मृत्यू सुजीत पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. त्यामुळे, पीडित कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोमय्या याचिकेमध्ये करणार आहेत.
आज 2 वाजता मी मानवी हक्क आयोग महाराष्ट्राकडे याचिका दाखल करणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 23, 2023
शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर पुणे येथे सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा गुन्हेगारी निष्काळजीपणा मुळे अनेक कोविड रुग्णाचा मृत्यू झाला
पीडित कुटुंबांना प्रत्येकी ₹५० लाख भरपाई द्यावी अशी मागणी
दरम्यान, कोविड काळात पुण्यातील शिवाजीनगर येथे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुजीत पाटकर आणि राजू साळूंखे यांची भागीदारी असलेल्या कंपनीला कोविड सेंटर उभारण्यासाठी कंत्राट दिले. कोविड सेंटर उभारण्यासाठी दोघांनी बोगस कंपनी निर्माण केली. तरीही ठाकरे सरकारने त्यांना कंत्राट दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
याप्रकरणी राजीव साळुंखे यांच्यासह पुण्यातील लाईफलाईन हॉस्पिटलचे भागीदार सुजीत पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शहा यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्यातील राजू साळूंखे यांना आता अटक करण्यात आली होती. त्यातच सोमय्यांनी आज याचिका दाखल केल्यानंतर सुजीत पाटकर आणि राजू साळूंखे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.