पुणेकरांच्या खिशाला कात्री बसणार ! सीएनजीचे दर पुन्हा वाढले

पुणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. कारण सीएनजीच्या दरात पुन्हा एकाद वाढ करण्यात आली आहे. टोरेंट गॅस लिमिटेड कंपनीने सीएनजीच्या दरात एक रुपयांची वाढ केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 8 Jun 2023
  • 03:12 pm
CNG rates : पुणेकरांच्या खिशाला कात्री बसणार ! सीएनजीचे दर पुन्हा वाढले

संग्रहित छायाचित्र

पुण्यात सीएनजीच्या दरात एक रुपयांची वाढ

पुणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. कारण सीएनजीच्या दरात पुन्हा एकाद वाढ करण्यात आली आहे. टोरेंट गॅस लिमिटेड कंपनीने सीएनजीच्या दरात एक रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता ८७ रुपये प्रतिकिलो मिळणार सीएनजी ८८ रुपये प्रतिकिलोने खरेदी करावा लागणार आहे. हे दर आज (गुरुवारी) मध्यरात्री १२ वाजेपासून लागू होणार आहेत.

वाहतुकीचा वाढता खर्च लक्षात टोरेंट गॅस लिमिटेड कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नव्या किमती पुणे, पिंपरी, चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या शहरांना लागू असणार आहेत. तसेच पुण्यातील ग्रामीण भागातही नव्या किमती लागू असणार आहेत.

टोरेंट गॅस कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ केल्यामुळे इतरही कंपन्या दर वाढण्याची शक्यता आहे. नव्या दरवाढीमुळे पुणेकरांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होईल. खिशाला कात्री बसल्याने प्रवाशांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest