पुणे : कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना खड्ड्यांचा वेढा; जीवघेण्या अपघातांची भिती

पुणे कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खड्डे इतके मोठ आणि खोल आहेत की त्यामुळे रस्ते पूर्णपणे असमतल झाले आहेत. परिणामी येथून दररोज प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावे लागत आहे.

Pune Cantonment Pits

पुणे : कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना खड्ड्यांचा वेढा; जीवघेण्या अपघातांची भिती

प्रवाशांना होताय प्रचंड त्रास, वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास

पुणे कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खड्डे इतके मोठ आणि खोल आहेत की त्यामुळे रस्ते पूर्णपणे असमतल झाले आहेत. परिणामी येथून दररोज प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावे लागत आहे.  

 कॅन्टोन्मेंटमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे वाहनचालकांच्या संयमाची परीक्षा घेत आहेत. या रस्त्यांची प्रभावी दुरुस्ती केली जात नसल्याने नादुरुस्त भागावर वाहने धडकतात. यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचा जीवघेणा अपघात होण्याचीही भिती कायम असते.

पुणे शहरामध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण होतात. रहिवासी आणि दैनंदिन प्रवासी त्या परिस्थितीचे वर्णन दुःस्वप्न म्हणून करतात, इतकी ती स्थिती वाईट असते. वेळेवर दुरुस्ती आणि देखभाल नसल्याबद्दल  रस्त्यांची वाट लागली आहे.  पुणे कॅन्टोन्मेंटच्या हैराण झालेल्या प्रवाशांना दिलासा केव्हा मिळेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात असून, एकेकाळी गजबजलेले रस्ते निराशाजनक अनुभव देत आहेत.   

वानवडी गाव आणि गोळीबार मैदानाजवळील काही भागांना ‘सीविक मिरर’ने भेट दिली असता रस्त्याचा पृष्ठभाग पूर्णपणे उखडलेला दिसून आला. सर्वत्र खड्डे आणि असमतल खाचखळगे दिसत होते.  या भागातील प्रवाशांना अतिशय धोकादायक परिस्थितीचा सामना करत प्रवास करावा लागतो. अशा प्रकारच्या ढासळलेल्या पायाभूत सुविधांमुळे रहिवासी आणि प्रवासी या दोघांसाठी सुरक्षितता आणि सुखरुप प्रवासाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

वानवडी येथील होले वस्तीतील रहिवासी आणि दैनंदिन प्रवास करणारे चेतन परदेशी यांनी ‘सीविक मिरर’कडे यासंदर्भात आपली चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘प्रिन्स ऑफ वेल्सचा शिंदे छत्री येथील ग्वाल्हेर पॅलेस ते वानवडी पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता अत्यंत दयनीय आहे. हा भाग  अपघातप्रवण झाला आहे. येथे कधीही जीवघेणा अपघात होऊ शकतो.”

परदेशी यांनी एका अपघाताचे वर्णन करताना सांगितले, “ऑगस्टमध्ये एके दिवशी मुसळधार पावसात माझ्या पुढे असलेल्या एका तरुण मुलीला दुचाकी चालवता आली नाही. ती घसरून स्कूटरवरून खाली पडली. तिच्या पायाला दुखापत झाली. आम्ही पटकन तिला उठायला मदत केली आणि तिची दुचाकी बाजूला केली. ती खाली पडलेली असताना एखादे मोठे वाहन समोरून किंवा मागून आले असते तर तिच्या जिवावर बेतले असते. ”   

या भागात संध्याकाळी सातनंतर दररोज वाहतूक कोंडी होते. कधीकधी आम्ही अर्धा ते पाऊण तास अडकतो. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र निकृष्ट कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत. तोंडदेखली दुरुस्ती आणि वाहतूक समस्यांमुळे प्रवासी वैतागले आहेत, असेही परदेशी यांनी सांगितले.  

रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज

वानवडीचे रहिवासी हर्षद बलसारा म्हणाले, ‘‘वानवडी गावाजवळील या खराब झालेल्या रस्त्यावरून मी नियमितपणे प्रवास करतो. कुटुंबासह प्रवास करत असताना अनेकदा माझी दुचाकी घसरली. सुदैवाने आम्ही दुखापतीपासून बचावलो. जर आपण पडलो आणि ट्रक किंवा बस त्याचवेळी भरधाव आली तर काय होईल, याचा विचारही भीतीपायी करवत नाही. गोळीबार मैदानासह या भागातील रस्त्यांची तातडीने आणि योग्य दुरुस्ती करण्याची गरज आहे.”  

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ अनुपलब्ध

यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘सीविक मिरर’ने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest