पुण्यातील सुकामेवा व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानसमधून येणाऱ्या सुक्यामेव्यावर बहिष्कार घातला आहे. व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळं तुर्कस्तानवर मोठा अर्थिक परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात दरवर्षी शंभरकोटीचार तुर्कस्थानातून सुक्यामेव्याची आयात केली जाते. दरम्यान तुर्कांनी पाकला दिलेला पाठिंबा पाहता पुणे मार्केट यार्ड परिसरात सुकामेवा व्यापारी असोशिएशनने पहिल्यांदा देश नंतर व्यापार अशी भूमिका घेतली आहे.
भारत पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावर तुर्कस्तानने पाकिस्तानला लष्करी आणि युद्ध सामग्रीची मदत केली होती. भारतीय लष्कर जसे सीमेवर लढत आहे. तसे आमचे व्यापार युद्ध असल्याचे पुण्यातील सुका मेवा व्यापारी संघटनेनं म्हटलं आहे.
तुर्किये आणि अजरबैजानच्या पाकिस्तान समर्थनामुळे भारतात संताप वाढला आहे. गाझियाबादमधील सहिबाबाद फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी तुर्कियेच्या उत्पादनांवर, विशेषतः सफरचंदांवर बहिष्कार टाकला आहे. पुण्यातील मसाले आणि सुकामेवा संघटनेने तुर्कियेचे जर्दाळू आणि हेझलनट्स आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय प्रवाशांनीही तुर्किये आणि अजरबैजानच्या प्रवास बुकिंग ६०% कमी केली, तर रद्दीकरणात २५०% वाढ झाली आहे.
१६ मे रोजी दिल्लीत प्रमुख उद्योगपतींची परिषद होणार असून, तुर्किये आणि अजरबैजानसोबत व्यापारी संबंध तोडण्याबाबत चर्चा होईल, असे भाजप खासदार आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.