Advertisement

Pune | रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे होणार सेफ्टी ऑडिट; काम अंतिम टप्प्यात असतानाच सुरक्षा तपासणीचा निर्णय…

इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शकानूसार होणार दुरुस्ती

पुणे : औंध-रावेत बीआरटी रोडवरील रक्षक चौकात उड्‌डाणपुलाचे काम सुरु आहे. उड्डाणपूल उभारताना कंत्राटदाराने उताराच्या तांत्रिक बाबीकडे पुरेसे लक्ष दिले नाही. तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता लक्षात घेवून महापालिकेकडून उड्डाणपुलाच्या सुरक्षा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. इंडियन रोड कॉंग्रेसच्या मार्गदर्शकानुसार तपासणी अहवाल आल्यानंतर दुरुस्ती केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून रक्षक चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बीआरटीएस रस्त्यावर हा उड्डाणपूल बांधला जात आहे. महापालिकेने २२.७७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प ठेकेदार मे.टी अॅन्ड टी इन्फा लिमिटेड दिला असून, में इन्फाकिंग कन्सल्टिंग इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सुमारे ७५ टक्के रक्कम अदा केली असून, प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाकडून रक्षक चौकात उड्डाणपूलाचे सेफ्टी ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंता संध्या वाघ म्हणाल्या की, उड्डाणपुलाच्या सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अहवाल पुढील काही दिवसांत अपेक्षित आहे. तपासणीतील निष्कर्षांच्या आधारे सुधारणात्मक उपाययोजना करण्यास तयार आहे.

उड्डाणपुलाची कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेकडून तपासणी करुन इंडियन रोड्स काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा तपासणीचे (सेफ्टी ऑडिट) आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उडडाणपूलाचे बांधकाम सध्या सुरूच राहील आणि लेखापरीक्षण अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर आवश्यक ते बदल लागू केले जातील.

तीव्र उतारामुळे भविष्यात वारंवार अपघातांचा धोका

खासदार श्रीरंग बारणे यांनी रक्षक चौकातील उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी केल्यानंतर पुलाच्या उताराचा मुद्दा समोर आला. पुलाचा उतार जास्त तीव्र असल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलावरही अशाच तीव्र उतारामुळे वारंवार अपघात होत असल्याचा दाखला देत त्यांनी प्रशासनाला सावध केले. रक्षक चौक हा वर्दळीचा मार्ग असल्याने हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यापूर्वी त्याच्या रचनेत आवश्यक सुधारणा करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. तसेच निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि सल्लागारांवर सदोष मनुष्यवधासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रकल्पाचे स्वरूप

•एकूण लांबी: ३६३ मीटर

•औंध बाजूकडील रॅम्पची लांबी: १२५ मीटर

•सबवेची लांबी : १८ मीटर

•जगताप डेअरी चौक बाजूकडील रॅम्पची लांबी: २२० मीटर

•सबवेची रुंदी : २६.४ मीटर

•सबवेची उंची : ५.५ मीटर

•निविदा रक्कम : १८ कोटी ६५ लाख

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

US-israel-iran war | होर्मुझमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर २० लाख डॉलर 'सुरक्षा कर'; इराणचा अमेरिकेसमोर १० कलमी प्रस्ताव...

Next Post

Pune | माता न तू वैरिणी..! शिरूरमध्ये आईनेच केली ११ महिन्याच्या मुलाची हत्या; संतापजनक कारण आले समोर....