पुणेकरांनो, शहरातील या भागाचा शनिवारपासून दिवसाआड होणार पाणीपुरवठा

पुणे शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार १८ मेपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, यामुळे खराडी परिसरातील काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे, खराडीमधील प्रभाग क्रमांक ४ मध्ये एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवार म्हणजेच १० जूनपासून होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 8 Jun 2023
  • 12:46 pm
पुणेकरांनो, शहरातील या भागाचा शनिवारपासून दिवसाआड होणार पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र

खराडीतील अपुऱ्या पाणीपुरवठ्यानंतर घेण्यात आला निर्णय

पुणे शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार १८ मेपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, यामुळे खराडी परिसरातील काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे, खराडीमधील प्रभाग क्रमांक ४ मध्ये एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवार म्हणजेच १० जूनपासून होणार आहे.

खराडी भागात होणाऱ्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामध्ये वेळेतही काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. याबाबत दिवस आणि वेळेचा सुधारीत तपशील खालीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, रविवार आणि मंगळवारी या भागात होणार पाठीपुरवठा :

सुधारित वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ६.०० : चंदननगर, श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, प्रीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रोड.

सुधारित वेळ सकाळी ९.३० ते दुपारी २.०० : चौधरी वस्ती, सातववस्ती, पंढरीनगर, गुलमोहर रक्षकनगर, शंकरनगर.

शनिवार
, सोमवार आणि बुधवारी या भागात होणार पाणीपुरवठा :

सुधारित वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ६.००
: बोराटे वस्ती गल्ली नं. १ ते १३, शंकरनगर, वृंदावन सोसायटी, राघवेंद्रनगर, यशवंतनगर, तुकराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क, साईबाबा मंदिर.

सुधारित वेळ सकाळी ९.३० ते दुपारी २.०० : गणपती सोसायटी, तुकारामनगर, बोराटेवस्ती, झेन्सार, थिटे नगर, पाटील बुवानगर.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest