Pune | पुणे जिल्हा परिषदेकडून शहर व जिल्ह्यातील ४६ अनधिकृत शाळांची यादी जाहीर, प्रवेश न घेण्याचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन...

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात काही शाळांना सरकारची मान्यता नाही. काही शाळांना सरकारी मान्यता आहे, पण त्या शाळा मूळ जागेवर भरतच नाहीत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

प्रातिनिधिक छायाचित्र...

Pune | पुणेकर पालकांनो सावधान,  आपल्या पाल्याचा कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यायचाय तर, केवळ शाळेच्या नावावर किंवा शाळा परिसरातील भुलभुलैया वातावरणावर भाळून जाऊन प्रवेश घेऊ नका. अन्यथा, तुम्ही स्वतःही फसाल, आर्थिक भुर्दंडही बसेल. एवढेच नव्हे तर, आपल्या पाल्याच्या शैक्षणिक नुकसानीच्या पापाचे धनी व्हाल.कारण पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहेत. हे टाळण्यासाठी पाल्याचा प्रवेश घेण्यापुर्वी संबंधित शाळा अधिकृत आहे की नाही, हे आधी तपासून पहा. यासाठी पुणे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग तुमच्या मदतीला धावून आला आहे. या विभागाने शहर व जिल्ह्यातील ४६ अनधिकृत शाळांची यादीच जाहीर केली आहे. शिवाय या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी केले आहे. 

नुकतेच यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे सध्या पालकांची आपापल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. या धामधुमीत माझ्या पाल्याला अमूक शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे, या हट्टापायी अनेकदा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश होण्याचा धोका असतो. यासाठी अगोदर अनधिकृत शाळांची यादी तपासून घेणे अनिवार्य आहे. 

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात काही शाळांना सरकारची मान्यता नाही. काही शाळांना सरकारी मान्यता आहे, पण त्या शाळा मूळ जागेवर भरतच नाहीत. याशिवाय काही शाळांना इरादापत्र आहे. पण त्यांनी अंतिम सरकारी मान्यता नाही,आदी बाबी प्रकाशात आल्या आहेत. तरीसुद्धा अशा अनधिकृत शाळाही अधिकृत मान्यता नसतानासुद्धा शाळा प्रवेशाची जाहिरात करत असल्याचे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका (गट) शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. या सर्वांनी आपापला शाळा तपासणी अहवाल पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. 

या अहवालानुसार १३ शाळा पुर्णपणे अनधिकृत,  ९ शाळांना सरकारी मान्यता आहे, पण ईरादापत्र नाही. शिवाय अन्य २४ शाळांकडे इरादापत्र आहे. पण अंतिम सरकारी मान्यता नसल्याचे आढळून आले असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी रविवारी (दि.१४ जून) सांगितले. 

गट निहाय अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे आहे. 

 

१) सरकारी मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळा (एकूण १३)

 

- एसपी इंग्लिश मिडियम स्कूल आव्हाळवाडी, वाघोली, ता. हवेली.

- कलर स्कूल ताथवडे, ता. मुळशी.

- न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे, ता. हवेली.

- किंग्जवे पब्लिक स्कूल, लोणावळा, ता. मावळ.

- माय स्कूल ताथवडे, ता. मुळशी.

- ज्ञानसागर एज्युकेशन सोसायटीचे न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल,बिबवेवाडी, पुणे शहर.

- स्वामी विवेकानंद एज्युकेशन फाउंडेशन नांदेड पुणेचे आयडियल पब्लिक स्कूल धायरी, पुणे.

- जीवन मित्र एज्युकेशन सोसायटी पुणेचे महात्मा गांधी प्रशाला संजय पार्क इंग्लिश स्कूल, पुणे शहर.

- तकवा एज्युकेशन ट्रस्टचे टीम्स तक्रया इस्लामिक स्कूल अँड मक्ताब कोंढवा खुर्द, पुणे. 

- समर्पण ख्रिश्चन ट्रस्टचे सेंट व्हयू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रूक, पुणे.

- केअर फाउंडेशन पुणेचे इमॅन्युअल पब्लिक स्कूल महमंदवाडी रोड, हडपसर, पुणे.

- यशवंत एज्युकेशन अँड मेडिकल प्रतिष्ठानचे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल, शेवाळेवाडी, सोलापूर रोड, पुणे.

- एलोरा मेडिकल अॅंड एज्युकेशन फाउंडेशनचे आर्यन वर्ल्ड स्कूल, नऱ्हे, पुणे शहर. 

 

२) इरादा पत्र प्राप्त झालेल्या पण सरकारी मान्यता नसलेल्या शाळा ( एकूण ९)

 

- पुणे इंटरनॅशनल स्कूल अष्टापुर मळा, कदमवाकवस्ती, पुणे. 

- सरस्वती विद्यामंदिर पिरंगुट, ता. मुळशी.

- सेवा फाउंडेशन पुणे लेगसी हायस्कूल अश्रफनगर कोंढवा बुद्रुक, पुणे शहर. 

- तंजीम वालेदैन मादारीस, पुणेचे शिबली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल अश्रमनगर, कोंढवा  बुद्रुक, पुणे शहर. 

- ज्ञानराज विद्या प्रसारक मंडळ संचालित ज्ञानराज विद्या प्राथमिक शाळा कासारवाडी, पिंपरी चिंचवड शहर.

- मानिनी एज्युकेशन फाउंडेशनचे स्टारडम इंग्लिश मीडियम स्कूल, चऱ्होली.

- स्टार एज्युकेशन सोसायटी लिटिलस्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर पुणे.

- दीपज्योती एज्युकेशन सोसायटी ओरॅकल इंग्लिश मीडियम स्कूल,चऱ्होली, पिंपरी चिंचवड.

- फर्नस एज्युकेशन सोसायटी द होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल, नवी सांगवी. 

 

३) सरकारी मान्यता असलेल्या पण मुळ जागेवर न भरणाऱ्या शाळा (एकूण २४)

 

- विद्यार्थी विचार प्रतिष्ठान के. के. इंटरनॅशनल स्कूल गट नंबर २४१, स्ट्रीट रोड बेटवाडी, ता‌. दौंड.

- रामदरा सिटी स्कूल रामदरा, लोणी काळभोर, ता. हवेली.

- जीजस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, खामशेत, ता. मावळ.

- एंजल इंग्लिश मीडियम हायस्कूल गणेशनगर, दत्तवाडी, नऱ्हे, पुणे शहर.

- चाणक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट, ता. मुळशी.

- पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट, ता. मुळशी.

- इलाईट इंटरनॅशनल स्कूल, कासारअंबोली, ता. मुळशी.

- संस्कार प्रायमरी  इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट, ता. मुळशी.

- श्री विद्याभवन इंग्लिश मिडीयम स्कूल,घोटावडे फाटा भरे, ता. मुळशी.

- श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव, ता. मुळशी.

- ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, ता. खेड.

- सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आळंदी चऱ्होली खुर्द,तालुका खेड. 

- श्री सरस्वती विद्यालय चिंबळी, ता. पुरंदर.

- श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल, वीर, ता. पुरंदर

- दिनकरराव जेधे पाटील एज्युकेशन सोसायटीचे प्रीती इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी, पिंपरी चिंचवड शहर.

- ग्लोबल वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी पुणेचे द ऑकरीच इंटरनॅशनल स्कूल, पारधेनगर कोंढवा खुर्द, पुणे शहर.

- इनटेक कॉम्प्युटर ससाणेनगर हडपसरचे माऊंट मेरी शाळा हडपसर, पुणे.

- सुफा एज्युकेशन सोसायटी गुरुवार पेठ पुणेचे नोबल एज्युकेशन स्कूल कोंढवा खुर्द, पुणे शहर.

- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सिंहगड सिटी स्कूल कोंढवा बुद्रुक, पुणे शहर.

- ग्रेस एज्युकेशन फाउंडेशन, कोंढवा, पुणेचे  न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, कोंढवा बुद्रुक, पुणे शहर.

- व्हिक्टर एज्युकेशन सोसायटी पुणेचे व्हॅल्यू इंग्लिश मीडियम स्कूल, स.नं. 39, शिंदेवस्ती, केशवनगर पुणे.

- उत्कर्ष शिक्षण कला व क्रीडा मंडळ आंबेगाव-धनकवडी पुणेचे उत्कर्ष इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आंबेगाव, पुणे शहर.

- उत्कर्ष शिक्षण कला व क्रीडा मंडळ आंबेगाव धनकवडी पुणेचे उत्कर्ष इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, धनकवडी.

- सोनाई शिक्षण संस्था कोंढवे धावडे पुण्याचे अजिंक्य देडगे पब्लिक स्कूल, नांदेड फाटा, नांदेड.

 

पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४६ शाळा अनधिकृत आहेत. नागरिकांना या शाळांची माहिती व्हावी, जेणेकरून त्यांची संभाव्य फसवणूक टळेल, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपापल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. अन्यथा आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होईल. 

- संजय नाईकडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, पुणे.

Share this story

Latest