पादचारी मार्गात विद्युत केबल....
खांबावर किती जाहिरातीचे फलक लावले याची नाही माहिती
पुणे : पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी उभारण्यात आलेल्या पुलांच्या खांबावर जाहिरात फलक लावून उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट मेट्रोने ठेवले आहे. परंतु दुसरीकडे या उत्पन्नाच्या नादाचा नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जाहिरात फलकाला वीज जोडणीसाठी टाकण्यात आलेल्या केबल्स भूमिगत करणे आपेक्षित त्या उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या अंधळ्या कारभारामुळे पादचाऱ्यांचा जीवाल धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. अनेक भागात मेट्रो सेवा देखील सुरु झाली आहे. मेट्रो जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलांच्या खांबावर जाहिरात फलक उभारण्याची परवानगी मेट्रोने दिली आहे. मेट्रोने जाहिरातीचे टेंडर काढून ते खासगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. जाहिरात फलकासाठी लावण्यात आलेल्या बोर्डमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत केबल्स टाकण्यात आली आहे. ही केबल मेट्रोने भूमिगत करणे आपेक्षित आहे. परंतु, नगर रस्त्यावर पुणेमेट्रोने रामवाडी मधील पादचारी मार्गात विद्युत केबल टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. टाकण्यात आलेली केबल ही हायटेंशन केबल असल्याचे दिसून येत आहे. या केबल मधून उच्च दाबाने विद्युत पुरवठा केला जातो. काही वेळा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्ता ओलाांडताना जर भविष्यात ही केबल जळाली किंवा शॉर्ट सर्किट झाली तर एकद्या पादचाऱ्याचा जीव जाण्याचा धोका आहे. त्यामुळे मेट्रोन तात्काळ ही केबल काढून घ्यावी, किंवा भूमिगत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ही केबल उघड्यावर असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रामवाडीमध्ये दोन पुणे महापालिकेच्या शाळा आहेत. तर नगररोड (वडगावशेरी) क्षेञिय कार्यालय, विविध प्रकारचे दवाखाने, बँका व विविध कार्यालय आहेत. त्यामुळे कामानिमित्त व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना शाळेत सोडवण्यासाठी नागरिकांना सतत रस्ता ओलांडावा लागतो. यासाठी रामवाडी गावठाणाच्या मुख्य प्रवेशद्वार समोर मेट्रो पिलर क्रमांक ४१७ व ४१८ मधून पादचारी मार्गाचा वापर केला जातो.
परंतु पुणे महामेट्रोने एका जाहिरात कंपनीला सर्व मेट्रो पिलर भाडे तत्वावर दिले आहेत. सदरील जाहिरात कंपनीने आपले बोर्ड प्रकाशित करण्यासाठी रामवाडी मधील मेट्रो पिलर क्रमांक ४१७ व ४१८ मधून पादचारी नागरिक ज्या ठिकाणी पाय ठेवून वर चढतात त्याच ठिकाणी जाहिरात कंपनीने धोकादायक पध्दतीने वीज वाहिनी टाकली आहे. रस्ता ओलांडताना जेष्ठ नागरिक, माता-भगिनी किंवा विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा केबलवर पाय अडकवून किंवा पाय घसरुन अपघात होवू शकतो. तसेच पादचारी मार्गातील धोकादायक विद्युत केबलमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रामवाडीतील मेट्रो पिलर क्रमांक ४१७ व ४१८ मधील पादचारी मार्गातील धोकादायक विद्युत केबल काढून ती भूमिगत करावी, अशी मागणी केली आहे.
नगर रस्त्यावर पुणेमेट्रोने रामवाडी मधील पादचारी मार्गात विद्युत केबल टाकण्यात आली आहे. शहरात केबल उघड्यावर न टाकता भूमिगत केल्या जात आहे. मात्र मेट्रोने ह्या केबल उघड्यावर टाकून नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहेत. याबाबतची तक्रार पुमे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली आहे.
- प्रमोद देवकर-पाटील, सामाजिक कार्यकर्ते.
ठेकेदारावर ढकलली जबाबदारी....
पुणे मेट्रोने मेट्रो पुलाच्या खांबावर जाहिराती लाण्याचे टेंडर काढले आहे. हे टेंडर एका खासगी ठेकेदाराला दिले आहे. पुण्याची सीव्हिल कोर्ट ते रामवाडी या मेट्रो मार्गासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचे तर सिव्हील कोर्ट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गासाठी १ कोटी ३७ कोटी रुपयांचे प्रत्येकी एका वर्षासाठी टेंडर काढण्यात आले आहे. ठेकेदाराकडून पूलाच्या खांबावर जाहिरात फलक लावले जात आहे. मात्र किती लावणार आहे, याची माहिती नाही. असे मेट्रो प्रशासनाने सीविक मिररला सांगितले. तसेच मेट्रोने केबल टाकण्याची जबाबदारी ठेकेदारावर ढकलली आहे. ठेकेदाराला ही केबल काढून टाकण्याचे आदेश दिले जातील, असे प्रशासनाने सांगितले.