अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी तडकाफडकी राजीनामा देत पुण्याच्या राजकीय गोटात एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचा नवा कारभारी कोण याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अनेक इच्छुकांची नावं देखील समोर आली आहेत. परंतु अद्याप मानकर यांचा राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. त्यामुळं शहरध्यपदासाठी इच्छुकांची गर्दी पाहता राजकीय वर्तुळात मानकर यांच्या राजीनामा प्रकरणाला नवं वळण लावलं जात आहे.
बनावट कागदपत्र सादर करत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात असल्याचा आरोप करत मानकर यांनी थेट पदाचा राजीनामा दिला. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी पवार यांना मानकर यांचा राजीनामा स्विकारु नका अशी विनंती केली असल्याचे समजते. दरम्यान, शहाराध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावं समोर आली आहेत.
तुपे, जगताप धनकवडे यांच्या नावाची चर्चा
अशातच, महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते राहिलेले तसेच दुसऱ्यांदा हडपसरमधून आमदार झालेले चेतन तुपे यांचे नाव शहाराध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर आहे. तसेच, वडगाव शेरीचे माजी आमदार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते असलेले सुभाष जगताप यांच्या नावाची देखील चर्चा शहाध्यपादासाठी सुरु आहे. त्यामुळं अजित पवार शहराध्यपदाचा कारभार नक्की कोणाकडे देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पालिका निवडणुकीसाठी नवं नेतृ्त्व?
मानकर यांनी स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळ या निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शहरातील नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात बुधवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये णादरा चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अन्य नावांची चर्चा करण्यात आली आहे. तसेच पक्षाचे कार्यध्यक्ष प्रदीप देशमुख यांना शहाध्यभपदी बढती द्यावी का ? याबाबतदेखील पक्षाने बैठकीत विचार केला असल्याचे सांगण्यात आलं आहे.
माझी बदनामी म्हणत राजीनामा
राष्ट्रवादी पूर्व पदाधिकारी असलेल्या शंतनु कुकडे याला परदेशी महिलेने दिलेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आले आहे. कुकडे याला अटक केल्यानंतर पोलिस तपासामध्ये कुकडे आणि मानकर यांच्यामध्ये काही कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मानकर यांना चौकशीसाठी बोलावले असता त्यांनी त्या व्यवहारासंदर्भात पोलिसांना सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मानकर यांच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर, " माझा वाढता आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजीकय बदनामी केली जात" असल्याचा आरोप करत शहराध्यक्षपदाचा राजीनामा अजित पवारांकडे राजीनामा दिला आहे.