Pune: सातवीच्या विद्यार्थ्यांचा सायकलवरील स्टंटमुळे अपघातानंतर मृत्यू

येरवडा : ‘सोशल मिडिया’ स्टंटेच अनुकरण शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. ऐखादा स्टंट करताना त्याच्या परिणामांची माहिती नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा अपघात होताे. अशा अपघातामुळे मुलांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. याची प्रचिती लोहगाव (Lohgaon) येथील एका इंग्रजी माध्यमाच्या

संग्रहित छायाचित्र

ससूनमध्ये अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान झाला दुर्दैवी मृत्यू

येरवडा : ‘सोशल मिडिया’ स्टंटेच अनुकरण शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. ऐखादा स्टंट करताना त्याच्या परिणामांची माहिती नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा अपघात होताे. अशा अपघातामुळे मुलांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. याची प्रचिती लोहगाव (Lohgaon) येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आला. या शाळेतील इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी नेहमी सायकल चालविताना स्टंट करायचा. मात्र, १ डिसेंबर २०२३ मध्ये या विद्यार्थ्याचा स्टंट करताना अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला सुरवातीला खासगी रुग्णालयात त्यानंतर ससून मध्ये उपचार केले गेले. तो बरा झाला. नियमित शाळेज जाऊ लागला. मात्र, २१ जानेवारीला २०२४ ला तो चक्कर येऊन पडला. त्याला ससून मध्ये अतिदक्षता विभागात हलविण्यात आले तेथे उपचारादरम्यान सत्यनकुमार महतो (वय १२) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  (Latest News Pune)

लोहगाव येथील ऐका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता सातवीत शिकणारा सत्यनकुमार सायकलीवर शाळेत येत असे. सायकलवर येताना व जाताना तो नेहमी स्टंट करीत असल्याचे शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितले. हे स्टंट त्याने सोशल मिडियावरील रिल्स पाहून करीत असल्याचे तो मित्रांना सांगत होता. असेच स्टंट करताना १ डिसेंबर रोजी त्याचा अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरवातीला लोहगावातील ऐका खासगी रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी डोक्याचा एमआरआय काढण्याचा सल्ला देऊन मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला त्याच्या पालकांना दिला.  

त्यानंतर पालकांनी येरवड्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ससून मध्ये काही दिवस उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.तो शाळेत नियमित जाऊ लागला. सत्येनकुमार मकर संक्रांतीला तो पंतग उडविण्यासाठी बाहेर पडला होता. तेथे त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले तो जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ त्याच्या नातेवाईकांनी ससून मध्ये दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात काही दिवस उपचार सुरू होते. मात्र, २१ जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. (Death of student)

Share this story

Latest