पुण्यात बस चालकाची दादागिरी; प्रवाशाला बेल्टने मारहाण, Video

बस चालकाची प्रवाशाला बेल्टने मारहाण

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Mon, 23 Jun 2025
  • 06:40 pm

 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बस चालक प्रवाशाला बेल्टने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील असून नागिरकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. 

मनपा ते तळेगाव ढमढेरदरम्यान, पीएमपीएमएलच्या बसच्या चालकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ हा प्रकार घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाने शिक्रापूर चाकण चौकात बस थांबवून खाली उतरुन प्रवाशाला बेल्टने मारहाण केली. काही प्रवासी चालक हा नशेत असल्याचा आरोप करत आहेत. बस चालवत असताना चालक अस्वस्थ असल्याचे प्रवासी सांगत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)

Share this story

Latest