Pune: गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख

शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी दिले होते.

शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस दलात अधीक्षक पदी असलेले देशमुख यांची नुकतीच पदोन्नतीने पुणे शहर पोलीस दलात बदली झाली होती. देशमुख यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी दिली.

पंकज देशमुख यांनी यापूर्वी पुणे पोलीस दलात वाहतूक शाखेत, तसेच परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

शहर पोलीस दलात बदली झालेले राजेश बनसाडे यांची पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बनसोडे यांनी यापूर्वी पुणे पोलीस दलात गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून काम पाहिले होते.

नागपूर पोलीस दलातून बदलून आलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांची प्रशासन विभागात नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Share this story

Latest