Accident : नववधूवराच्या मोटारीला भीषण अपघात, ओझर-नारायणगाव मार्गावरील घटना; ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जुन्नर तालुक्यातील ओझर येथे विवाहसोहळा उरकून नववधूवराची मोटार साताऱ्याच्या दिशेने निघाली. त्यावेळी नारायणगावकडून ओझरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव मोटारीने नववधूवराच्या मोटारीला समोरून धडक दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sun, 27 Apr 2025
  • 04:50 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

पुणे: जुन्नर तालुक्यातील ओझर येथे विवाहसोहळा उरकून नववधूवराची मोटार साताऱ्याच्या दिशेने निघाली. त्यावेळी नारायणगावकडून ओझरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव मोटारीने नववधूवराच्या मोटारीला समोरून धडक दिली. या अपघातात नववधूवर आणि चालकासह पाच जण जखमी झाले. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनोज भास्कर हांडे (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओतूर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलला सायंकाळी साडेचारच्या सुमारास ओझर-नारायणगाव मार्गावर हा अपघात झाला.  २५ एप्रिलला साडेबाराच्या सुमारास ओझर येथे फिर्यादी यांच्या भाचीचा विवाह पार पडला. त्यानंतर विवाहतील सर्व सर्व धार्मिक विधी उरकून विवाहित जोडपे मोटारीतून ओझर येथून साताऱ्याकडे जाण्यास निघाले. ओझर येथील पुलाजवळ त्यांची मोटार पोहोचली. तेव्हा नारायणगावकडून ओझरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव मोटारीने नववधूवराच्या मोटारीस समोरून धडक दिली. या अपघातात नववधूवर, चालक आणि नातेवाईक असे पाचजण जखमी झाले आहेत. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जखमींना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, पोलिसांनी अविचाराने, निष्काळजीपणाने आणि रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून मोटार चालवून आपघाताला जबाबदार ठरल्याप्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत.

Share this story

Latest