Amol Kolhe : सोमाटणे फाट्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी केले वाहतूक नियमन

मोशी येथे एका कार्यक्रमासाठी निघालेल्या खासदार डॉ अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांना जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) सामना करावा लागला. शनिवारी संध्याकाळी ते मोशीच्या दिशेने जात असताना सोमाटणे फाट्यावर वाहतूक कोंडीमध्ये अडकले.

Amol Kolhe

सोमाटणे फाट्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी केले वाहतूक नियमन

वाहतूक कोंडी झाल्याने स्वतः उतरून केली वाहतूक सुरळीत

पुणे : मोशी येथे एका कार्यक्रमासाठी निघालेल्या खासदार डॉ अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांना जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) सामना करावा लागला. शनिवारी संध्याकाळी ते मोशीच्या दिशेने जात असताना सोमाटणे फाट्यावर वाहतूक कोंडीमध्ये अडकले. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी वाहनामधून खाली उतरत स्वतः सोमाटणे फाटा चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला. वाहन चालकांना सूचना देऊन ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी एक्स हॅण्डल वर पोस्ट केला आहे. दरम्यान, त्यांनी नितीन गडकरी आणि शासनाला चिमटे काढणारा मजकूर देखील या पोस्टमध्ये नमूद केला आहे.

या पोस्टमध्ये डॉ कोल्हे यांनी 'पुणे-नाशिक हायवेवरील बायपास आपल्या प्रयत्नांतून सुरू झाले आहे. तरी अजून खेड ते नाशिक फाटा दरम्यान आणि पुणे-नगर हायवेवरील वाघोली ते शिरूर दरम्यान इलिव्हेटेड कॉरिडॉर झाला नसल्याने जनतेला रोज नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. हे इलिव्हेटेड कॉरिडॉर व्हावे, यासाठी आपण सातत्याने संसदेत आवाज उठवत आहोत. त्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आपल्या प्रयत्नांतून याकामी अनुक्रमे ९ हजार कोटी आणि ११ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पण, अजून प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. मी मायबाप जनतेच्या या रोजच्या त्रासाकडे केंद्र सरकारचे सातत्याने लक्ष वेधत आहे. पण म्हणावी तशी गती या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मिळत नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, 'आज सोमाटणे फाटा येथे तशीच परिस्थिती होती. ट्रॅफिक पोलीस बांधवांना मदत म्हणून आणि खासदार या नात्याने जनतेच्या सेवेचा प्रामाणिक प्रयत्न रस्त्यावर उतरून सुद्धा केला. येत्या काळात संसदेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, ते त्याच जोमाने सुरू ठेवणार, असा शब्द शिरूरच्या मायबाप जनतेस देतो,असं त्यांनी नमूद केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest