Pune: मेधा कुलकर्णींनी हनुमान जयंतीला मशिदीतील अजान थांबवली; कारवाई होणार?

राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Thu, 17 Apr 2025
  • 05:14 pm
hanuman jayanti,medha kulkarni,PUNE NEWS,Pune  Police,hanuman jayanti,medha kulkarni,PUNE NEWS,Pune  Police, medha kulkarni stopped azaan mosque hanuman jayanti sheikh salahuddin dargah in pune complained police

पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.  छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टकडून मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांनी आजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी या वेळी जवळच असलेल्या ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे रात्री सव्वा आठच्या दरम्यान अजान होत असताना गलिच्छ शिविगाळ करुन अजान रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, येथून पुढे अजान आणि नमाज पडाये नाही. नाही तर तुम्हाला त्यांचे परिणा भोगावे लागतील. अशी धमकी दिल्याचे ही तक्रारीत म्हटलं आहे. 

हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे. मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकीचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याद्वारे वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार असल्याची टिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली केली. 

नेमकं काय घडलं?

रविवार दिनांक (13 एप्रिल) हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेघा कुलकर्णी यांनी या वेळी जवळच असलेल्या एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्यासाठी ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यातील मस्जिदीत अजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

 यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांना मेधा कुलकर्णी यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.यासंदर्भात ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टकडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

Share this story

Latest