मोहिमेत सहभागी व्हा: जबाबदार चालक बना आणि स्वत: बरोबर इतरांचेही प्राण वाचवा !
या उपक्रमात सहभागी होण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय होती ?
शहरातील नागरिकांमध्ये जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्याची संस्कृती तयार व्हावी, हा सेलेबिलिटीचा या वाहतूक विषयक उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश होता. बेजबाबदार वाहन चालवण्यास आळा घालणे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि इतरांच्या रस्ता वापराच्या हक्काचा सन्मान करण्याची जाणीव वाहन चालकांना व्हावी हा उपक्रमामागील मुख्य हेतू. अशी जबाबदारीची जाणीव तयार झाली तर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाने होणारे अपघात कमी होतील आणि अपघातातून होणाऱ्या जखमींची संख्याही कमी होईल. आपला समाज अधिक सुरक्षित आणि जबाबदार असावा या सामाजिक हेतूने हाती घेतल्या जाणाऱ्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
एक पुणेकर म्हणून तुम्हाला असे का वाटते की, या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, मदत करण्यासाठी नागरिक पुढे येतील ?
पादचारी, सायकलस्वार आणि वाहनचालकांसाठी पुणे सुरक्षित असावे. सुरक्षित रस्ते आणि जबाबदारीने वाहतूक नियमांचे पालन झाल्यास पुणे सुरक्षित होईल. प्रत्येक पुणेकराला तसेच वाटते. हा उपक्रम हाती घेण्यामागे सेलेबिलिटीचा हाच उद्देश आहे. यामुळे माझा विश्वास आहे की यासाठी नागरिक पुढे येऊन पाठिंबा देतील, सक्रिय भाग घेतील.
दिवसेंदिवस पुण्याचे क्षितिज विस्तारत असताना वाहतूक समस्या आपण आटोक्यात का ठेवू शकत नाही ?
वाहतूक आणि वाहनांची कोंडी हा पुण्याचा प्रदीर्घ काळाचा प्रश्न आहे. सुरक्षित वाहतुकीचे शिक्षण, स्वयंशिस्त. सिग्नल आणि रस्त्यावर नेमकी काय स्थिती आहे, याविषयी आपल्याकडे पुरेशी, नेमकी आकडेवारी नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर गेल्या काही दिवसांत पुणे अतिशय वेगाने वाढले आहे. मात्र, वाढलेले हे पुणे नियोजनबद्ध वाढलेले नाही. यामुळे अपुरी घरे, वाहतूक आणि संवाद अशी नेहमीची आव्हाने आज आपल्या समोर आहेत.
पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यासाठी एक व्यक्ती म्हणून तुम्ही काय करू शकता ?
शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ, सुरळीत होण्यासाठी अनेक मार्गाने आपण मदत करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम आणि बंधनांचे काटेकोर पालन करून रस्ता कसा सुरक्षित राहील त्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. दुसरे म्हणजे जेथे शक्य असेल तेथे मी कारचा सामुदायिक वापर करण्याकडे लक्ष देईन. यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल आणि पर्यायाने वाहतूक कोंडी. याशिवाय शहरात सर्वसमावेशक वाहतूक योजना राबवण्याचा मी पुरस्कर्ता आहे आणि त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. यामुळे शहरातील वाहतूक समस्येवर उत्तर निघू शकेल आणि भविष्यातील बहुद्देशिय वाहतूक व्यवस्थेचे दिशा दर्शन होईल.
पुणेकरांना काय संदेश द्याल ?
पुण्यात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे आव्हानात्मक काम आहे, याची मला कल्पना आहे. कर्णकर्कश हॉर्न, असह्य उष्णता आणि वाहनांची कोंडी या नेहमीच्या स्थितीमुळे अंगावर काटा येतो. असे असले तरी एक जबाबदार नागरिक म्हणून नियमाचे पालन करून प्रत्येकाच्या दृष्टीने रस्ता कसा सुरक्षित राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपण वाहतुकीचे नियम पाळतो तेव्हा आपण केवळ स्वत:ला सुरक्षित ठेवत नाही तर, आपल्या प्रियजनांना आणि शहरवासियांनाही सुरक्षित ठेवत असता. वाहतूक नियमांचे पालन करून अपघातांची संख्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करत असतो.