Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस; राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हा कार्यक्रम सरकारचा नाही, धनगर समाजाचा आहे. समाजाच्या भावना आणि निर्णय यानुसारच कोणाला बोलवायचं हे ठरतं. त्यामुळे अजित पवार यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 17 Apr 2025
  • 12:56 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

सग्रहीत छायाचित्र

पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य ‘धनगरी नाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात तब्बल ५०,००० धनगरी ढोल वाजवणार आहे, महाराष्ट्रातील विविध भागांतील धनगर बांधव यात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र निमंत्रण दिलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हा कार्यक्रम सरकारचा नाही, धनगर समाजाचा आहे. समाजाच्या भावना आणि निर्णय यानुसारच कोणाला बोलवायचं हे ठरतं. त्यामुळे अजित पवार यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  

गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस : सुरज चव्हाण

सुरज चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट करत गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे. जसा शेखचिल्ली फांदी कापताना तुटायचा बाजूने बसून स्वतःच झाडावरून पडला होता. तसा हा शेखचिल्ली महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय. या शेखचिल्लीला माहित पवारांना विरोध केला तरचं राजकीय जिवंत राहू शकतो. पवारांशिवाय या शेखचिल्लीची मार्केट किंमत झिरो आहे, असा हल्लाबोल सुरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे. आता सुरज चव्हाण यांच्या टीकेवर गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this story

Latest