पुणे : काच उतरवून घेताना काच अंगावर पडल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू

पुण्यातील येवलेवाडी भागातील ‘इंडिया ग्लास सोल्युशन’या नावाने मोठा काचेचा कारखान्यातून काच उतरवताना मोठा अपघात झाला. या अपघाता काच अंगार पडल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच चार कामगार जखमी झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Sun, 29 Sep 2024
  • 06:44 pm

काचेचा कारखान्यातून काच उतरवताना मोठा अपघात

येवलेवाडी भागातील घटनेने पुण्यात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे: पुण्यातील येवलेवाडी भागातील ‘इंडिया ग्लास सोल्युशन’या नावाने मोठा काचेचा कारखान्यातून काच उतरवताना मोठा अपघात झाला. या अपघाता काच अंगार पडल्याने  चार कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच चार कामगार जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पुण्यात खळबळ उडाली.

अमित शिवशंकर कुमार (वय २७, धंदा मजूर, सध्या राहणार धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू. पुणे, कायमचा पत्ता- रायबरेली उत्तर प्रदेश), विकास सर्जू प्रसाद गौतम (वय २३ वर्षे धंदा मजूर, सध्या राहणार धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू. पुणे. कायमचा पत्ता- उत्तर प्रदेश), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०) आणि पवन रामचंद्र कुमार (वय ४४ वर्षे धंदा मजुरी राहणार धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू. पुणे. कायमचा पत्ता- सलोन, रायबरेली उत्तर प्रदेश) अशी मृत्यू झालेल्या कामगरांची नावे आहेत.

तर जगतपाल संतराम सरोज (वय ४९ वर्षे, धंदा मजुरी, रा. धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू.) व मोनेश्वर (पूर्ण नाव माहित नाही) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला जात असून कंपनीच्या मालकावर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. हा अपघात रविवारी (दि.२९) दुपारी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी भागात ‘इंडिया ग्लास सोल्युशन’या नावाने मोठा काचेचा कारखाना आहे. या कारखान्यात काचावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते विक्रीसाठी बाजारात आणले जातात. प्रक्रियेसाठी विविध भागातून या कारखान्यात काचा येत असतात. अशाच काचेचा ट्रक रविवारी (दि.२९) कारखान्यावर आला होता. ट्र्क मधील काच उतरवून घेण्यासाठी १० कामगार एकत्र आले होते. त्यांच्याकडून नियोजनानुसार काच उतरवण्याचे काम सुरु होते.

ट्रकमधून मोठे काचेचे स्लाईड खाली उतरवत असताना काचेचे स्लाईडला बांधण्यात आलेला बेल्ट तुटल्याने दोन मोठे काचेचे स्लाईड या मजुरांच्या अंगावर पडले. यात अंगावरच काच पडल्याने काचेचे तुकडे अंगात घुसल्याने चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांनतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर कामगारांवर उपचार सुरु आहेत. भीषण घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच स्थनिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने मोठी खळबळ माजली असून, पोलीस हा कारखाना कोणाचा याचा शोध घेत आहेत.

येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात ही मोठी दुर्घटना घडली. चार कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. मृतांचा पंचनामा केला जात आहे. तसेच या प्रकरणी चौकशी केली जात असून या प्रकरणी गु्न्हा दाखल केला जाणार आहे. कारखान्याच्या मालकाचा शोध घेतला जात असून त्याच्यावर देखिल गन्हा दाखल केला जाईल.

 - विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन.

 

कोंढव्यातील येवलेवाडी येथील इंडिया ग्लास सोल्युशन या काचेच्या कारखान्यात अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये ठेवण्यात आलेले एका बाजूचे काचेचे मोठे बॅक्स कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडले. यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. कारखान्याचे मालक हुसेन 'तय्यब अली मिठावाला' असे नाव आहे. अग्नीशमन दलाच्या दहा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- समीर शेख, स्टेशन ड्युटी ऑफिसर, कोंढवा अग्नीशमन दल केंद्र.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest