Pune : महासंचालक विवेक श्रीवास्तव यांची अग्निशमन दलास भेट

गुजरात केडरचे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक श्रीवास्तव यांनी नुकतीच पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागाचे मुख्यालय व मारुंजी येथील पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथे भेट देत अग्निशमन दलाची माहिती घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 17 Apr 2025
  • 01:12 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

पुणे:  गुजरात केडरचे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक श्रीवास्तव यांनी नुकतीच पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागाचे मुख्यालय व मारुंजी येथील पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथे भेट देत अग्निशमन दलाची माहिती घेतली.

यावेळी त्यांचे स्वागत पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी जवानांकडून मानवंदना देत केले. पुणे शहरात होणाऱ्या विविध आगीच्या घटनांबद्दल त्यांना सांगितले. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार त्यानूसार अग्निशमन विभागाची पदे, अग्निशमन केंद्रे, अग्निशमन वाहने व उपकरणे आणि प्रशासकीय कामकाज याबद्दल अवगत केल. याचप्रमाणे पीएमआरडीए अग्निशमन विभागाची कुमक व सेवा याविषयी सांगून जिल्ह्यात आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदतीसाठी नुकत्याच सुरु केलेल्या “पुणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स” बद्दल माहिती दिली.

यावेळी विवेक श्रीवास्तव यांनी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या असंख्य आगी व आपत्कालिन वर्द्या तसेच यंत्रसामुर्ग्री यावाषयी समाधान व्यक्त करत अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे व जवानांच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 

 

Share this story

Latest