Dagdusheth : 'दगडूशेठ' गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ' गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभाऱ्यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आली. फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 23 May 2023
  • 10:47 am

'दगडूशेठ' गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त करण्य़ात आली आकर्षक सजावट

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ' गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभाऱ्यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आली. फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली.

भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. या दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे ही सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती.

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायक ऋषिकेश रानडे व सहकारी यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी देखील पार पडले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest