Dr. Jayant Narlikar Passes Away : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवारांनी घेतले अंत्यदर्शन...

जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्प चक्र अर्पण केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Wed, 21 May 2025
  • 01:46 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

Dr. Jayant Narlikar Passes Away

पुणे : जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्प चक्र अर्पण केले. 

आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) येथे याप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टर नारळीकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी पोलीस दलाने सलामी, शोकशस्त्र तसेच बाजूशस्त्र सलामी दिली. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Share this story

Latest