स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनामुळे वाहतुकीत बदल

शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे रविवारी उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Sep 2024
  • 11:11 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आज विशेष कार्यक्रम

शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे रविवारी उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनानिमित्त रविवारी (२९ सप्टेंबर) सकाळी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग परिसरातील जमनालाल बजाज पुतळा परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार जेधे चौक ते जमनालाल बजाज पुतळा या दरम्यान दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येईल. आवश्यकतेनुसार या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी जेधे चौकातून व्होल्गा चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. सातारा रस्त्याने उड्डाणपुलावरून सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे.

शिवाजीनगर न्यायालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक ते तोफखाना चौक रस्ता परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक मार्ग आवश्यकता भासल्यास दुहेरी करण्यात येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest