एफ.सी. रोड परिसर अचानक सील करण्यात आला. त्यानंतर शहरात बॉम्ब ब्लास्ट झाल्याची माहिती पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हा ब्लास्ट खरा नसून पोलिसांची नियोजित सराव ड्रिल आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. असे स्पष्टीकरण देत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले.
आपत्कालीन परिस्थितीचा सराव म्हणून बॉम्ब ब्लास्ट मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला होता. या डमी बॉम्पस्फोटचा व्हिडीओ सोशली मडियावर व्हायरल झाले आहेत. गंभीर प्रसंगात तत्काळ कसे प्रतिसाद द्यायचे याचा अनुभव घेण्यासाठी बॉम्ब ब्लास्ट मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते.
या मॉक ड्रिलदरम्यान बॉम्बस्फोटाचे काल्पनिक दृश्य निर्माण करण्यात आले. त्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, बॉम्ब शोध पथक, अग्निशामक दल व वैद्यकीय पथकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्याची प्रात्यक्षिके दाखवली. परिसर त्वरित सील करून वाहतूक व्यवस्थापनही करण्यात आले.
आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी शांतता व संयम बाळगणे, पोलीसांच्या सूचनांचे पालन करणे आणि अफवांवर विश्वास न ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सरावाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे पोलिसांच्या तयारीची चाचणी घेणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.”
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा मॉक ड्रिलच्या वेळी सहकार्य करावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचनांचे काटेकोर पालन करावे. असही यावेळी डॉ. भाजीभाकरे म्हणाले.


