भरधाव पीएमपी बसची महिलेसह दोघांना धडकभरधाव पीएमपी बसची महिलेसह दोघांना धडक

भरधाव आलेल्या पीएमपी बसने बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवासी महिलेसह एकाला धडक दिली. ही घटना नेहरू रस्त्यावरील सोनवणे रुग्णालयासमोर घडली. अपघातात महिलेसह तिघेजण जखमी झाले आहेत. तसेच याच पीएमपी बसने रिक्षाला धडक दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Sep 2024
  • 10:57 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नेहरू रस्त्यावरील सोनवणे रुग्णालयासमोरील घटना

भरधाव आलेल्या पीएमपी बसने बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवासी महिलेसह एकाला धडक दिली. ही घटना नेहरू रस्त्यावरील सोनवणे रुग्णालयासमोर घडली. अपघातात महिलेसह तिघेजण जखमी झाले आहेत. तसेच याच पीएमपी बसने रिक्षाला धडक दिली.

युवराज बबन नवले (रा. कुरण, ता. जुन्नर), कुसुम विश्वनाथ लोंढे (रा. ताडीवाला रस्ता), फारुक शेख अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पीएमपी बसचालक गणेश बाळासाहेब नायकल (वय ३५, रा. कोहिनूर हॉटेलजवळ, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत किशोर बालाजी परदेशी (वय ३८, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहरू रस्त्यावरील सोनवणे रुग्णालयासमोर पीएमपी थांब्यावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास नवले, लोंढे थांबले होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने प्रवासी नवले आणि लोंढे यांना धडक दिली. बस थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या रिक्षालाही धडक दिली. या अपघातात नवले, लोंढे आणि रिक्षाचालक शेख जखमी झाले. अपघातानंतर तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात नवले गंभीर जखमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. बसचालक नायकल याच्या चुकीमुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हवालदार येलपले तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest